घुग्गुस पोलिस स्टेशन हद्दीत गोतस्करावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

चंद्रपुर – जिल्हयातील गोवंश तस्कारांवर आळा घालण्याकरिता  पोलिस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. त्यावरून घुग्घुस हद्दितून गणेशोत्सवा दरम्यान रात्रौ गोवंश ची अवैद्यरित्या वाहतुक होत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक  महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना गोवंश तस्कारांविरूध्द कारवाई करण्याबाबत निर्देश दिले.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे विशेष पथकाने दि. २१/०९/२०२३ रोजी रात्रौ १०.०० वा. दरम्यान घुग्घूस पोलिस स्टेशन  हद्दित
एमआयडीसी–शेणगाव रोडवर सापळा रचून असता एक TATA XENON गाडी क. MH-04-GC-7497 हि पिकअप गाडी काहि गोवंश निर्दयपणे कोंबून वाहतूक करीत असतांना दिसून आल्याने सदर वाहनास विशेष पथकाने थांबवले असता ड्रायव्हर सदर वाहन वेगाने पळवू लागला. तेव्हा स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे विशेष पथकाने सदर पीकअप गाडीचा पाठलाग केला असता एका निर्जन स्थळी गाडी उभी करून अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. उभ्या TATA XENON गाडी क. MH-04-GC- 7497 ची पाहणी केली असता सदर वाहनात ०९ जिवंत गोवंश निर्दयपणे कोंबून असल्याचे दिसले. सदर ०९ जिवंत गोवंशची सुटका करून व वैदयकिय तपासणी करून प्यार फॉउंडेशन गौरक्षण संस्था, दाताळा येथे सुखरूप पोहचविण्यात आले. तसेच TATA XENON गाडी क. MH-04-GC-7497 चा फरार चालक-मालका विरूध्द पो.स्टे. घुग्घूस येथे अप.क्र. ३९३ / २०२३ कलम ११(१), (ड) प्रा.नि.वि. कायदा १९६०, सहकलम ५ अ (१), ५ ब, ९, ११ महा. प्रा. संरक्षण कायदा, सहकलम ८३, १३०/१७७ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कामगिरी. पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी ,अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू  यांचे मार्गदर्शनाखाली महेश कोंडावार, पोलिस निरीक्षक  स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात सपोनी नागेशकुमार चतरकर, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर  ना.पो.अ. अजय बागेसर , चंदू नागरे ,पो.अ. प्रशांत नागोसे चानापोअ दिनेश अराडे  यांनी यशस्वीपणे केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!