
मध्यप्रदेशातुन गडचिरोली येथे जाणारा मद्यसाठा स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त…
अवैधरित्या मध्यप्रदेशातुन गडचिरोली येथे जाणारा दारुसाठा स्थानिक गुन्हे शाखेने पकडला,वाहनासह एकुन १० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…


चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे लोकसभा निवडनुक व महाशिवरात्री चे अनुषंगाने चंद्रपुर शहरात व शहराबाहेरुन जाणाऱ्या दारुच्या तस्करी संबंधात कठोर कार्यवाही करण्याचे आदेश नुतन पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सर्व प्रभारी तथा स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांना देण्यात आल्या त्याअनुषंगाने चंद्रपुर जिल्ह्यामध्ये अवैध मद्य विक्री तसेच निर्मीती व वाहतुक करणावरोधात धडक मोहीम चंद्रपुर
पोलिसांच्या वतीने चालु आहे. त्याच मोहीमेच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन केले असून सदर पथकाच्या माध्यमातुन मोठ्याप्रमाणात अवैधरित्या दारूची वाहतुक करणाऱ्यांची माहिती काढून त्यावर कार्यवाही सुरू आहे.
त्यानुसार दिनांक ०७/०३/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. चे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहिती मिळाली की, एक बोलेरो पिकअप वाहन मध्यप्रदेश येथून गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारूची वाहतुक करून विक्रीकरीता नेत आहे. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर येथे सापळा रचला असता चंद्रपुर रोडने येणारी महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम. एच. ३४ बी. जी. ४१२६ या वाहनास शिताफीने ताब्यात घेवून वाहनाची तपासणी केली असता,

१) गोवा ब्रँन्ड दारूनी भरलेल्या १८० एम एल च्या ३९ पेट्या किंमत एकुण २,१४,५००/-रू,

२)एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा वोलेरो पिकअप वाहन क्र एम. एच. ३४ बी.जी. ४१२६ किंमत ८,००,०००/- रु
३) दोन नग मोबाईल किंमत १०,०००/- रू.
असा एकुन १०,२४,५००/- रू. चा मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोस्टे बल्लारपूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्ह्यातील आरोपी नामे
१) फारूख शेख मुमताज शेख, वय २१ वर्ष, धंदा ड्रायव्हर, रा. नुरानी नगर, लालकिल्ला गेट जवळ, महल, नागपूर जिल्हा नागपूर
२) तुषार संतोष नेहारे, वय २३ वर्ष, धंदा मजुरी, रा. चिचभवन, वर्धा रोड, शांतीनिकेतन (झोपडपट्टी) नागपूर
यांस पुढिल तपासकामी पोस्टे बल्लारपूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरचा मुद्देमाल कुठून आणला व कुठे चालला
यावावतचा तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि. ओकरे, पोउपनि विन्द भुरले, पोहवा. संजय आतकुलवार,पोशि गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, सायबर गुन्हे शाखेचे राहुल पोंदे यांनी केली आहे.


