कत्तलीकरीता जाणाऱ्या ३५ गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने केली सुचका,मालवाहु ट्रकसह ५४ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

कत्तलीसाठी जनावरांची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या दोन मालवाहक ट्रकसह ५४ लाख रू मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही….

चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपुर जिल्ह्यामध्ये अवैध धंदे, व्यवसाय करणाऱ्याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर पोलिसांच्या वतीने चालु आहे. त्याच मोहीमेच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक. मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन केले असून सदर पथकाच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात अवैधरित्या कत्तलीसाठी जनावरांची वाहतुकीची माहिती काढून त्यावर कारवाई सुरू आहे.





त्याअनुषंगाने दि १६ एप्रिल २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहिती मिळाली की, रात्रीच्या वेळी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी वरून मुल- चंद्रपुर मार्गाने तेलंगाणा राज्यात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात जनावरांची अवैध वाहतुक होणार आहे. सदर माहितीवरून लागलीच नाकाबंदी करून व सापळा रचुन चामोर्शी वरून येणाऱ्या दोन संशयीत ट्रकला थांबविले असता, मागच्या ट्रकमधील ड्रायव्हर व त्याच्या सोबतचा एक इसम पळून गेला. सदर दोन्ही ट्रकमध्ये पाहणी केली असता, दोन्ही ट्रकला प्लॅस्टीकच्या ताडपत्रीने वरून झाकुन त्यामध्ये ३५-३५ असे एकुण ७० गाय, बैल (गोवंश) (ट्रकसह एकुण किंमत ५४ लाख रूपये) दाटी-वाटीने, कोणत्याही प्रकारची चारा-पाण्याची व्यवस्था न करता, त्यांना आडवे पाडून, चारही पायांना दोराने बांधुन वाहतुक करून कत्तलीसाठी नेत असल्याचे दिसून आले.



तसेच एका ट्रकमधील ड्रायव्हर यास ताब्यात घेतले असून दोन्ही ट्रकमधील सर्व गोवंश प्यार फाऊंडेशन (गौरक्षण संस्था), पडोली येथे गोवंशांच्या संरक्षणाकरीता जमा करण्यात करण्यात आले.तसेच १) राजीक जब्बार खान, वय ५० वर्ष, धंदा चालक, रा. गडचांदूर, जिल्हा चंद्रपुर (चालक) २) शाहरुख खान, रा.नागपूर, जि. नागपूर,३) करीम खान, रा. नागपुर, जि. नागपुर ४) राजु कुरेशी, रा. कामठी रोड, पिली नदी जवळ, नागपुर (मालक) ५) इरफान शेख, रा. गडचांदूर, जि. गडचांदुर ६) प्रशांत बाला जुमनाके, रा. गडचांदूर, जि. चंद्रपुर या आरोपींविरोधात पोस्टे मुल येथे विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पुढिल तपासकामी पोस्टे मुल यांच्या ताब्यात देण्यात आले.



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक सुदर्शन मुमक्का,अपर पोलिस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, मधुकर सामलवार, सुनिल गौरकार, पोहवा. सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठ्ठावार, सतिश अवथरे, दिपक डोंगरे, सुरेंद्र महंतो,चेतन गज्जलवार, कार्तीक खनके (सायबर पो.स्टे.), पोशि. प्रशांत नागोसे, किशोर वकाटे, गणेश भोयर, शशांक बदामवार, चापोहवा. दिनेश आराडे, चापोअं. मिलींद टेकाम, स्थागुशा चंद्रपुर, पोस्टे तळोधी येथील सपोनि. संगिता हेलोंडे, पोहवा रत्नाकर देहारे, अक्षय हटवार, सुरेश आत्राम यांनी केली आहे.

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!