
छत्रपती संभाजी नगर मधे हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,दिल्ली,मुंबईसह परदेशी ललना ताब्यात…
बिड बायपास परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर सिडको पोलिसांनी छापा मारून 5 जणांना केली अटक, पुणे,मुंबई सह विदेशी तरुणी व दिल्लीच्या 2 तरुणींची केली सुटका…
छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, बिड बायपास परिसरात आलीशान बंगल्यात सुरू असलेल्या या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर सिडको पोलिसांनी छापा मारून 5 जणांना अटक केली. विदेशी तरुणीसह दिल्लीच्या 2 तरुणींची केली सुटक या सेक्स रॅकेटसाठी कुख्यात तुषार राजेंद्र राजपूत आणि प्रवीण बालाजी कुरकुटे यांच्यासह अन्य तिघांना यात अटक करण्यात आली.असुन कॅसीनोत नौकरीच्या बहाण्याने उझबेकिस्तानची 28 वर्षीय तरुणी देशाच्या उच्चभ्रू सेक्स रॅकेटमध्ये
सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पुण्यातील टॉप महिला दलाल कल्याणीच्या माध्यमातून ती गेल्या 8 दिवसांपासून शहरात देहविक्री करत होती.



उच्चशिक्षित प्राध्यापक सुनील रामचंद्र तांबट (५४, रा. एन-७)
याने स्वतःच्या ट्यूशनच्या तळमजल्यातच वेश्याव्यवसाय सुरू केल्याचे सिडको पोलिसांनी उघडकीस आणले. त्याचा साथीदार संदीप मोहन पवार वय ३२ वर्ष , रा. जाधववाडी यांच्यासह अटक
करण्यात आली. त्यांच्या चौकशीत बीड बायपासवर तुषारच्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटची माहिती पोलिसांना समजली होती त्यानुसार पोलिस उपायुक्त परीमंडळ २, नवनीत काँवत यांनी कारवाईच्या सुचना केल्या होत्या त्यानुसार पोलिस निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी मंगळवारी सायंकाळी ७ वाजता बीड बायपासवरील एका उच्चभ्रू वसाहतीतील बंगल्यावर डमी ग्राहक पाठवला. वेश्याव्यवसायाची खात्री होताच छापा टाकला. त्यानंतर तुषार, प्रवीणसह अन्य पाच जणांना अटक केल्याचे पोलिस उपायुक्त नवनीत कॅावत यांनी सांगितले

महत्वाचे म्हनजे या ठिकाणी भारतीय मुलींची ४ हजार तर विदेशी मुलींसाठी ८ ते १० हजार रुपयांमध्ये देहविक्री चालत होती. तुषारच्या मोबाइलमध्ये शहरातील अनेक नामवंत व्यावसायिक, राजकीय पुढाऱ्यांचे नाव आढळल्याचेही पोलिसांनी सांगितले. तोच सर्व स्थानिक व्यवहार सांभाळत होता. तुषार, प्रवीणला शेवटचे १७ ऑक्टोबर २०२० रोजी बायपासवर अटक झाली होती. त्याच्यावर ६ तर प्रवीणवर ३ गुन्हे दाखल आहेत. गेल्या २० वर्षापासून तुषार सेक्स रॅकेट चालवतो. देशभरातील एजंटसोबत त्याचा संपर्क आहे. मात्र, शहरातील सेक्स रॅकेटमध्ये पहिल्यांदाच पुण्याच्या कल्याणीचे नाव समोर आले. कारागृहात राहूनही कल्याणी देशभरात सेक्स रॅकेट चालवण्यासाठी कुख्यात आहे


