कलेक्शन एजंटला लुटणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

खाजगी फायनान्स कंपनीच्या कलेक्शन एंजटला जबरीने लुटणार्या २ चोरट्यांना शिताफिने स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अशोक दादाभाऊ भालेराव वय 26 वर्षे रा. पानेगाव ता. अंबड जि. जालना यांनी पोलिस ठाणे पाचोड येथे तक्रार दिली कि, ते खाजगी फायनान्स कंपनीत कलेक्शन एजंट म्हणुन नौकरीला असुन दिनांक 8/2/24 रोजी सायंकाळी 06:10 वाजेच्या सुमारास फायनान्स कंपनीचे कलेक्शन करून त्यांचे मित्रासह ते मोटरसायकलने गुळज ते हिरडपुरी कच्चा रस्त्याने येत असतांना त्यांना हिरडपुरी शिवारात मोटरसायकलवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गाडीला मोटरसायकल आडवी लावुन त्यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांचे बॅगेत ठेवलेले 1,18,356/- रुपये जबरदस्तीने हिसकावुन नेले. यावरून भादंवी कलम 392,34 प्रमाणे पोलिस ठाणे पाचोड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.





मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक यांचे निर्देशानुसार नमुद गुन्हयाचा पाचोड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत असतांना गुन्हयांचे अनुषंगाने  सतिष वाघ, पोलीस निरीक्षक यांना गोपनीय बातमीदारा मार्फेत माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा मठजळगाव ता. अंबड येथील दोन व्यक्तींनी मिळुन केला आहे. यावरुन तांत्रिक विश्लेषणाचे आधारे स्था.गु.शा. चे जबरी चोरी विरोधी पथकाने मठजळगाव ता. अंबड या परिसरात सापळा लावला. यावेळी संशयीत व्यक्ती हे त्यांचे मोटरसायकलवर मठजळगाव या गावातुन बाहेर जात असतांना त्यांना सिरनेर फाटा येथे पथकाने त्याचेवर अचानक झडप घालुन त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्याचे नाव 1) सुदर्शन ज्ञानेश्वर पोखरकर वय 23 वर्षे 2) सचिन गणेश पोखरकर वय 28 वर्षे दोघे रा. मठजळगाव ता. अंबड जि. जालना असे सांगितले. त्यांना गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस करता ते पोलीसांना उडवा उडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्यांचेवर अधिक संशय बळावल्याने त्यांना विश्वासात घेवुन कसोशिने विचारपुस करता त्यांनी नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्यांनी गुन्हयात वापरलेली मोटरसायकल, मोबाईल फोन असा एकुण 75,000/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद गुन्हयात 1) सुदर्शन ज्ञानेश्वर पोखरकर वय 23 वर्षे 2) सचिन गणेश पोखरकर वय 28 वर्षे दोघे रा. मठजळगाव ता. अंबड जि. जालना यांना अटक करण्यात आली असुन पुढील तपास पाचोड पोलीस करित आहेत. यातील आरोपीतांनी अशाच प्रकारे इतर फायनान्स कंपनीचे कलेक्शन एजंट यांना जालना जिल्हयातील अंबड, हद्यीत लुटले असल्याचे तपासात निष्पन्न होत आहेत. तसेच यातील आरोपी क्रमांक (1) यांचेवरती छत्रपती संभाजीनगर शहर अंतर्गत पोलिस ठाणे एम. वाळुज येथे मोटरसायकल चोरीचा तर अंबड येथे मोबाईल फोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यावरुन ते सराईत चोरटे असुन पोलिसापासुन स्वत:ची ओळख लपवण्यात पटाईत असल्याने त्यांना अत्यंत शिताफिने जेरबंद करण्यात आले आहे.



सदरची कारवाई ही मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली  सतिष वाघ, पोलिस निरीक्षक,  भगतसिंग दुलत, पो.उप.नि. पोलिस अंमलदार दिपेश नागझरे, संजय घुगे, वाल्मिक निकम, अशोक वाघ, योगेश तरमळे, जिवन घोलप, संजय तांदळे सर्व स्थागुशा. यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!