जबरी चोरी करुन पसार होणार्या सराईत चोरट्यांना गंगापुर पोलिसांनी फिल्मीस्टाईल केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

गंगापुर(छत्रपती संभाजी नगर)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १५/११/२३ रोजी मध्यरात्री ०१.०० वा सुमारास  पोलिस ठाणे गंगापुर हद्यीतील छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर महामार्गावरिल भेंडाळा फाटाच्या पुढे नादी पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या महाराष्ट्र ढाबा येथे तीन अज्ञात व्यक्तीने हॉटेल मध्ये घुसून हॉटेलच्या कॅश काउंटर जवळ झोपलेले हॉटेल मालक

फिरोज सांडू शेख वय २७ वर्षे रा. ढोरेगाव





यांना लोखंडी सळईने मारहाण करून चाकुचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांचे हॉटेलच्या गल्यातील ९७००/- रूपये रोख हिसकावुन घेवुन त्यांनी शाईन मोटरसायकल क्रमांक एम.एच. 20 डी.पी. 5641 ही वर बसुन पळुन गेले बाबत माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली.  यावरुन  सत्यजीत ताईतवाले, पोलिस निरीक्षक गंगापूर यांनी त्यांचे पथकासह तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी करून जबरीचोरी करणारे चोरटयाचे गाडीचे व त्यांचे वर्णन फिर्यादी फेरोज शेख यांचे कडुन घेतले. तसेच अंधाराचा फायदा घेत तीन्ही चोरटे हे छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने सुसाट वेगात गेले असल्याची माहिती त्यांना मिळाली.सदरची सर्व माहीती पोलिस अधिक्षकांना देऊन मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार पोलिस ठाणे गंगापूरला लागुन असलेल्या सर्व रोडवर नाकाबंदी करुन सर्तक करण्यात येवुन संशयीत वाहन व व्यक्ती बाबत शोध सुरू करण्यात आला होता. यावेळी पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले व त्यांचे पथक संशयीताचे मागावर असतांना त्यांना अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगरकडे कडे जाणारे महामार्गावरिल ईसारवाडी फाटयाचे अलिकडे ढोरेगाव नजिक बंद असलेल्या ईसार कंपनीच्या पेट्रोलपंप जवळ काही संशयीत हालचाल निदर्शनास आली. यावरुन पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले व त्यांचे पथकांने तात्काळ पेट्रोलपंपाच्या दिशने धाव घेवुन पोलिसांनी त्यांचे वाहन अलिकडेच उभे केले, बराच अंधार झालेला असल्याने बंद असलेल्या ईसार पंपाच्या परिसरात लपत छपत गेले असता, तेथे काहि अंतरावर संशईत मोटरसायकल दिसुन आली. तसेच संशईत व्यक्तीं या परिसरात लपून बसले आहेत याबाबत हालचाल पोलिसांचे लक्षात आल्याने त्यांनी बंद असलेल्या ईसार पेट्रोल पंपाच्या परिसराला घेराव घालुन सापळा आखला, पोलीसांचे पथक पुढे पुढे जात असतांना लपलेल्या व्यक्तींना पोलिसांची चाहुल लागताच त्यांनी अंधारात शेतातील रस्त्याने सुसाट पळ काढला. यावेळी पोलिसांनी सुध्दा त्यांचा अंधारात कसोशिने पाठलाग सुरू केला, अंधाराचा फायदा घेवुन पळुन जाण्याच्या प्रयत्नात असतांना पोलिसांनी या तिन्ही व्यक्तींना शिताफिने सकाळी ४.३० वा  सुमारास म्हणजे अवघा ३ तासाच्या आत  मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले. यावेळी त्यांनी त्यांचे नावे पुढील प्रमाणे सांगितली



 १) जुबेर नासेर शेख, वय २९ वर्ष,



२) शेख ईरफान शेख सरवर वय २७ वर्ष,

३) रिझवान पाशेखान वय २८ वर्ष सर्व रा. नेहरूनगर, कटकटगेट, हत्तीसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर

त्यांना विश्वासात विचारपुस करता त्यांनी हॉटेल मालक यांना मारहाण करून जबरीने हॉटेलच्या गल्यातील ९७००/- रूपये रोख चोरुन पसार झाल्याचे कबुल केले.  त्यांचे ताब्यातुन हॉटेल मालकाकडुन जबरदस्तीने चोरून नेलेले ९७००/- रूपये रोख, तीन मोबाईल, शाईन मोटरसायक,चाकु, असा एकुण ६३,७००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांचे विरुध्द पोलिस ठाणे गंगापूर येथे भादंवी कलम ३९४,३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद गुन्हयात त्यांना अटक करण्यात आली आहे. नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर छत्रपती संभाजीनगर शहर येथे सुध्दा गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास गंगापुर पोलिस करित आहेत.

सदरची कारवाई ही मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलिस अधीक्षक, महक स्वामी ,उपविभागीय पोलिस अधिकारी ,गंगापुर यांचे मार्गदर्शनाखाली,  सत्यजीत ताईतवाले, पोलिस  निरीक्षक, पो.उप.नि. अजहर शेख, पोलिस अंमलदार दिनकर थोरे, गंगावणे,अभिजीत डहाळे, अमोल कांबळे, तेनसिंग राठोड यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!