पुर्व वैमनस्यातुन केलेल्या खुनाचा २४ तासाचे आत लावला छडा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

मौजे सिरसगाव कन्नड येथील माजी सरपंचाचा भरदिवसा केलेल्या खुनातील आरोपींना 24 तासात केले जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर (ग्रा) ची कामगिरी….

छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि-12 जुलै 2025 रोजी तक्रारदार सुरज राजाराम चुंगडे रा.सिरसगाव ता. कन्नड यांनी पोलिस ठाणे कन्नड ग्रामीण येथे तक्रार दिली की त्याचे वडील राजाराम उर्फ राजु भावसिंग चुंगडे वय-47 वर्षे व्यवसाय शेती माजी सरपंच सिरसगाव हे सिरसगाव ते वैजापुर रोडलगत शेत गट नं.28  मौजे सिरसगाव येथे हे त्यांचे शेतातील घरासमोरील खडीवर मोबाईल बघत बसले असतांना अचानक तीन ईसमांनी पाठीमागुन येऊन धारदार कोयत्याने डोक्यात, हातावर वार 07 ते 08 वार करुन जागीच ठार केले व  मारेकरी मोटार सायकलवरुन फरार झाले. अशा मुलाचे  फिर्यादीवरुन पोलिस ठाणे कन्नड ग्रामीण येथे गु.र.न. 173/2025 कलम 103(1),3(5) भा.न्या.सं.-2023 अन्वये गुन्हा  करण्यात आला होता





सदर घटणेची माहिती मिळताच नमूद गुन्हयांचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण डॉ. विनयकुमार मे. राठोड व अपर पोलिस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी घटनास्थळास भेट देवून घटनेचे गांर्भीय ओळखून पोलिस निरीक्षक स्था.गु.शा विजयसिंह राजपुत व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांना आरोपीतांचा शोध घेवून आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या.



त्यावरून गुन्ह्यांची माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी स्थागुशाचे वेगवेगळे तपास पथक तयार करुन मिळालेल्या प्राथमिक माहितीवरुन आरोपीचे शोधकामी पथके रवाना केली.याबाबत गावातील पार्श्वभूमी व अलीकडील काही दिवासापुर्वी गावात घडलेल्या गुन्हयांच्या घटणेबाबत सखोल चौकशी केली असता मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे आनंद अमर राजपूत वय-25 वर्षे रा. सिरसगाव ता. कन्नड यास ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत चौकशी केली, त्याने गुन्हा कबुल करुन राजाराम उर्फ राजु भाऊसिंग चुंगडे यास त्याचे साथीदार 1) समीर समद कुरेशी वव-20 वर्षे रा. सिरसगांव ता. कन्नड, 2) इरफान शकील शहा वय-20 वर्षे दोघे रा. सिरगाव ता. कन्नड यांचेसह मिळुन कोयत्याने डोक्यात वार करुन जिवंत ठार मारल्याची कबुली दिली.



तसेच स्था.गु.शा. पथक हे तपास करीत असतांना 1) समीर समद कुरेशी वय-20 वर्ष रा. सिरसगांव ता. कन्नड, 2) इरफान शकील शहा वय-20 वर्षे रा. सिरगाव ता. कन्नड यांचा मिळालेल्या माहितीवरुन श्रीरामपुर, अहिल्यानगर जिल्हयात कसोसिने शोध घेतला व आज दिनांक 13/07/2025 रोजी  1) समीर समद कुरेशी 2) इरफान शकील शहा, यांना श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले त्यांना गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी नमूद गुन्हा 3) आनंद अमर राजपूत याचेसह मिळून केला असल्याची कबूली दिली.यावरुन  तिन्ही आरोपींना गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी राजाराम उर्फ राजू भाऊसिंग चुंगडे यांनी आरोपी क्र.01 अमर राजपुत यास एक ते दिड वर्षापुर्वी मारहान केली होती त्याचा राग मनात ठेवल्याने आरोपी क्र.02 समीर कुरेशी, याचेवर दाखल अॅट्रॉसीटीच्या गुन्हात मदत न केल्याने, व आरोपी क्र. 03 ईरफान शहा याने सदर मयत हे नेहमी कब्रस्तानच्या जागेच्या वादावरुन आमच्या समाजाला मदत करत नाहीत. यापुर्व वैमस्यातुन खुन केला असले कबूल केले.

पुढील अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार पोस्टे कब्रड ग्रामीण हे करित आहेत. यातील आरोपी क्रमांक 2) समीर कुरेशी हा पोस्टे कन्नड ग्रामीण गुरनं. 131/2025 कलम 115 (2),352,351(2)333,3 (5) भा.न्या.सं.-2023 सहकलम-3(1)(r)(s),3(1)(va) अ.जा.ज.अधि. मध्ये फरार आहे. तसेच आरोपी क्रमांक 3) ईरफान शहा याचेवर हा पोस्टे कन्नड शहर गुरनं. 198/2025 कलम 118(1), 352 भा.न्या.सं. मध्ये फरार आहेत. नमूद आरोपीतांना पुढील कायदेशीर कार्यवाही कामी पोस्टे कन्नड ग्रामीण येथे हजर करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड, अपर पोलिस अधिक्षक  अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी, विजयकुमार ठाकुरवाड, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  विजयसिंह राजपुत, स.पो.नि. संतोष मिसळे, पवन इंगळे, सुधिर मोटे, पोह/श्रीमंत भालेराव, वाल्मीक निकम, विठ्ठल डोके, शिवानंद बनगे, गोपाल पाटील, प्रशांत नांदवे, अशोक वाघ, महेश बिरूटे, योगेश तरमाळे, जिवन घोलप तसेच पोस्टे कन्नड ग्रामीणचे पोस्टे प्रभारी अधिकारी रामचंद्र पवार, पो. उपनि. जाधव व स्टाफ यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!