सराईत दुचाकी चोरटे १२ तासाचे आत LCB ने केले जेरबंद,लाखोच्या १४ दुचाकी केल्या जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

सराईत दुचाकी चोरटे 12 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद, जेरबंद 7,65,000/- रू किंमतीच्या 14 मोटारसायकली जप्त….

छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे वैजापुर येथे फिर्यादी विजय बाबुलाल त्रिभुवन व श्री संदीप वैजीनाथ जगधने दोघे रा. वैजापुर यांनी तक्रार दिली कि, दिनांक 12/4/2024 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास त्रिभुवन यांची रॉयल इन्फील्ड क्लासिक बुलेट क्रमांक एम.एच. 15 एफ सी. 0636 ही वैष्णव लॉन्स लासुर रोड, वैजापुर येथुन तर जगधने यांची बजाज प्लाटीना मोटरसायकल क्रमांक एमएच 20 एफई 9202 ही कोर्ट परिसराच्या आवारातुन कोणी तरी अज्ञात व्यक्तींनी लवाडीच्या ईराद्याने चोरुन नेले वावत भांदवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.



एकाच वेळी वैजापुर शहरातुन दोन मोटरसायकल चोरी गेल्यामुळे तसेच शहरातील मंगलकार्यालय तर्सच लॉन्स व इतर शासकिय कार्यालयाचे समोरुन दुचाकी चोरीचे घटना सातत्याने घडत असल्याने वाहनचोरीच्या गुन्हयांचा जलद गतीने छडा लावण्याचे अनुषंगाने मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी वैजापुर पोलीसांसह सदर गुन्हयांचा समांतर तपास करण्याचे स्थानिक गुन्हे शाखा यांना निर्देश दिले होते.



स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाहनचोरीच्या गुन्हयातील सराईत आरोपीबाबत गोपनीय माहिती घेत असतांना पोलिस निरीक्षक सतिष वाघ यांना लग्न सराईत लॉन्स व मंगल कार्यालयाचे परिसरातून दुचाकी चोरी करणा-या अजिंक्य बोडखे रा. कारखाना बोरसर, वैजापुर यांचे बाबत माहिती मिळाली होती.





यावरुन पथकाने त्याचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे कसोशिने शोध सुरू केला असता तो वैजापुर कडुन लासुर स्टेशन कडे जात असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच लासुर स्टेशनच्या दिशेन धाव घेवुन संशयीत अजिंक्य बोडखे याचा पाठलाग सुरू करून त्यास लासुर गाव परिसरातील टोलनाक्याचे अलिकडेच ताब्यात घेतले. तसेच त्याला विश्वासात घेवुन कसोशिने विचारपुस करता त्यांने पोलीसांना सांगितले कि, त्यांनेच वरिल दोन्ही नमुद दुचाकीची चोरी केली आहे. तसेच चोरी केलेल्या दुचाकी या त्याचा साथिदार नामे दिपक जगताप याचे मदतीने अत्यंत कमी भावात विक्री करतो असे सांगितले.

आरोपी अजिंक्य बोडखे यांने वैजापुर परिसरातील साई लॉन्स, सुभद्रा लॉन्स, द्रौपती लॉन्स, पंचायत समिती, धुमाळ मंगल कार्यालय, कोर्ट परिसर, असे गर्दीच्या परिसरातुन याचप्रमाणे शिर्डी व येवला परिसरातुन सुध्दा दुचाकी वाहनाची चोरी केली असुन ही सर्व वाहने त्याने त्याचे कारखाना चौफुली, बोरसर परिसरातील शेतामधील पत्राचे चाळीमध्ये लपवुन ठेवले असल्याचे सांगितले.

यावरुन पथकाने लागलीच त्याचा साथीदार दिपक काकासाहेब जगताप याला वैजापुर शहरातुन शिताफिने ताब्यात घेवुन त्यांनी शेतात लपवुन ठेवलेली दुचाकी वाहने यामध्ये  होंडा युनिकॉन (01) ,वजाज पल्सर (01),होंडा शाईन (04 नग), वजाज प्लाटिना (02 नग), हिरो एचएफ डिलक्स (01) ई) हिरो स्पलेंडर (03 नग), बजाज सिटी 100 (01 नग), रॉयल इन्फिल्ड बुलेट (01 नग) असे एकूण 14 दुचाकी वाहने 7,65,000/- रूपये किंमती च्या जप्त करण्यात आले आहेत.

नमुद गुन्हयांचा छडा हा गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासात लावुन सराईत दुचाकी चोरटे 1) अजिंक्य ऊर्फ लाल्या अनिल बोडखे वय 19 वर्षे रा. कारखाना वोरसर, ता. वैजापुर 2) दिपक काकासाहेव जगताप वय 35 वर्षे रा. शिवराई रोड, वैजापुर यांना चोरीच्या दुचकीसह अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन अधिक वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने पुढील तपास हा वैजापुर पोलिस करित आहेत.

सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक. मनीष कलवानिया,अपर पोलिस अधीक्षक  सुनिल कृष्णा लांजेवार, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  सतीष वाघ, पो.उप.नि भगतसिंग दुलत, नामदेव सिरसाठ, दिपेश नागझरे, संजय घुगे, वाल्मिक निकम, अशोक वाघ, राहुल गायकवाड, योगेश तरमाळे, संजय तांदळे यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!