वाहनांचे स्पेअरपार्टची दुकाने फोडणारी आंतराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात…
स्पेअरपार्टची दुकाने फोडणार्या आंतरजिल्हा टोळीला स्ऱ्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेशांतर करून मालेगाव जि. नाशिक येथुन केले जेरबंद,एकुन 12,18,554/- रु चा मुद्देमाल केला जप्त….
छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – या बाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे चिकलठाणा हद्दीतील शेंद्रा शिवारात प्रकाश कचकुरे रा.कुंभेफळ (करमाड) यांचे संकल्प सेल्स कॉर्पोरेशन नावाचे ऑईल,ग्रीस,बेल्ट इत्यादी वाहनाचे स्पेअरपार्ट विक्रीचे दुकान असुन दिनांक 18/02/2024 रोजी अज्ञात ईसमांनी त्यांच दुकानाचे शटरचे कुलूप तोडुन, शटर वाकवुन दुकानातील 93 ग्रीसच्या बकेट, संगणक, प्रिंटर, चहा/काफी मशिन असे साहित्य चोरुन नेले होते या अनुषंगाने पोलिस ठाणे चिकलठाणा येथे भादंवी कलम 380, 461 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याचप्रमाणे दिनांक 23/02/2024 रोजी पोलिस ठाणे अजिंठा हद्दीतील शिवना येथील महाराष्ट्र ॲटो पार्टस व गॅरेज येथील सुध्दा दुकानाचे अज्ञात ईसमांनी शटर कुलूप तोडुन, शटर उचकाटुन त्यातील ऑईल गॅलन, बॉल जॉईट रॅक, टायर रॉड, क्रॉम किट, शॉकअप, गॅसकिट, बल्प, इत्यादी साहित चोरुन नेले होते याबाबत शेख अजहर शेख सलिम रा. शिवना ता.सिल्लोड याचे फिर्यादीवरुन पोलिस ठाणे अजिंठा येथे कलम 380,461 भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस अधिक्षक मनीष कलावानिया यांनी पोलिस ठाणे चिकलठाणा व अजिंठा यांचे सह नमूद गुन्हयाचे समांतर तपास करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले होते. यावरून पोलिस निरीक्षक सतीष वाघ, स्थागुशा यांनी सदर गुन्हयाचे अनुषंगाने पो.उप.नि. विजय जाधव यांचे पथकास आरोपींचा शोध घेण्याबाबत नेमले असता. नमुद गुन्हयांची बारकाईने माहिती घेवुन ॲटोमोबाईल्स दुकानातील सामानाची चोरी करणा-या टोळींचा कसोशिने शोध त्यांनी सुरू केला. यावेळी आरोपींचा माग काढत असतांना त्यांना गोपणीय बातमीदार मार्फेत माहिती मिळाली कि, नमुद दोन्ही दुकाने ही मालेगाव जि. नाशिक येथील सराईत गुन्हेगारांनी फोडली असुन त्यातील माल घेवुन ते पसार झाले आहे.
यावरुन पो.उप.नि. विजय जाधव व त्यांचे पथकांने मालेगाव येथे जावुन साधारण 03 ते 04 दिवस वेशांतर करून संशयीत आरोपींचा शोध सुरू केला. यावेळी त्यांनी मालेगाव जि. नाशिक येथे ब-याच परिसरात रात्र-दिवस कसोशिने शोध घेतला असता. तांत्रिक विश्लेषणाचे आधारे संशयीत आरोपी हे रमजानपुरा, मालेगाव, जि. नाशिक परिसरातील एका पत्र्याचे गोडावुन मध्ये लपुन बसल्याचा सुगावा लागला.
यावेळी पथकाने माहिती मिळालेल्या रमजानपुरा, मालेगाव परिसरात रात्री 12:00 वाजेच्या सुमारास वेशांतर करून सापळा लावला असता अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागात आरोपींना ओळखने पथकापुढे मोठे आवाहन ठरले होते. त्याचप्रमाणे या भागात मोठया प्रमाणावर पत्र्याचे गोडावुन असल्याने आरोपीतांचा शोध घेणे गुंतागुंतीचे ठरत होते. यावेळी पथकाने या भागातील एका संशयीत हालचाल जाणवलेल्या गोडाऊन ची रेकी करून त्यावर बारकाईने लक्ष ठेवुन दबा धरून बसले असता तेथे संशयीत ईसम हा गोडावुन बाहेर आल्याने त्यास बातमीदार याने ओळखल्याचा ईशारा करताच पथकाने अचानक त्यांचेवर झडप घालुन त्यास ताब्यात घेतले. याचप्रमाणे अजुन एक व्यक्ती हा गोडाऊनचे आतमध्ये असल्याचे जाणवल्याने त्याला सुध्दा पथकाने ताब्यात घेवुन विचारपुस करता त्यांनी त्यांची नावे 1) असिफ ईकबाल शेख अहमद वय 30 वर्षे रा. अजमल हॉटेल जवळ, रमजानपुरा, मालेगाव जि. नाशिक 2) मुजसीर अहमद जमीर अहमद वय 28 वर्षे रा. नुरबाग, रमजानपुरा, मालेगाव जि. नाशिक असे सांगितले.
यावेळी त्यांना विश्वासात घेवुन कसोशिने विचारपुस करता त्यांनी वरिल दोन्ही दुकाने ही त्यांचे इतर साथीदारसह फोडुन त्यातील माल चोरुन नेल्याची कबुली दिली. तसेच त्यातील काही माल हा गोडावुन मध्ये लपवुन ठेवल्याचे सांगितले. त्याचे ताब्यातुन गाडयांचे स्पेअर पार्ट, ऑईल कॅन, ग्रीस डब्बे, इत्यादी साहित्य असे दोन्ही गुन्हयातील चोरी केलेला मालापैकी 12,18,554 /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद दोन्ही आरोपींना वरिल गुन्हयात अटक करण्यात येवुन त्यांच्या इतर साथीदांराचा पोलिस कसोशिने शोध घेत आहे. सदर गुन्हा घडल्यापासुन अवघ्या 30 दिवसांत त्याची उकल करुन चोरी गेलेल्या मुद्देमालासह आंतरजिल्हा टोळीस पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश मिळाले आहे. पुढील तपास अजिंठा व चिकलठाणा पोलुस करित आहेत.
सदरची कामगीरी ही पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया,अपर पोलिस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार, यांचे मार्गदर्शनाखाली सतिष वाघ, पोलिस निरीक्षक,विजय जाधव, पो.उप.नि. पोलिस अंमलदार शेख कासम, गोपाल पाटील, विठ्ठल डोके, नरेंद्र खंदारे .योगेश तरमळे, संजय तांदळे यांनी केली आहे.