अवैध दारु विक्रेता ग्यानसिंग याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…
अवैधपणे बनावट गावठी हातभट्टी दारुची निर्मिती व चोरटी विक्री करणारा सराईत आरोपीस एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…..
छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया,यांनी जिल्हयातील संघटित गुन्हेगारीला लगाम लावत अशा गुन्हेगारांन विरूध्द कठोर भुमिका घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहे. जिल्हयात अवैधरित्या बनावट गावठी हातभट्टीची दारुची निर्मिती, चोरटी विक्री करणा-या ईसमा विरुध्द सक्त भुमिका घेवुन अशा गुन्हयातील आरोपीला पहिल्यादांच एम.पी.डी.ए. ॲक्ट खाली हर्सुल कारागृहत स्थानबध्द करण्यात आला आहे.
पोलिस ठाणे पाचोड हद्यीतील ईसम नामे ग्यानसिंग शिवलाल चव्हाण वय 45 वर्षे रा. पारुंडी तांडा ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर हा आडदांड व गुंड वृत्तीचा असुन तो कायद्याला जुमानत नाही तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकामध्ये दहशत निर्माण करून त्या दहशतीच्या जोरावर तो गावठी हातभट्टी दारूचा बेकायदेशिर धंदा चालवत होता. तसेच तो तयार करत असलेल्या बनावट गावठी हातभट्टीच्या दारू मध्ये कोणत्याही घटकाचे निश्चित प्रमाण नसल्याने अशी बनणारी दारु मानवी आरोग्यास घातक व धोकादायक ठरणारी असते. त्यामुळे पाचोड व नजिकच्या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन त्यामुळे परिसरातील नागरिकांचे जनजिवन विस्कळीत झालेले आहे.त्याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (फ) अन्वये एकुण 06 गुन्हे दाखल असुन त्याचेवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 93 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई सुध्दा करण्यात* आली होती. परंतु याबाबीचा त्याच्येवर काहि एक परिणाम न होता त्याने त्याच्या गुन्हेगारी व धोकादायक कारवाई चढत्या क्रमाने चालुच ठेवलेल्या होत्या.
त्याअनुषंगाने एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ॲक्टिविटी) कायद्यानुसार म्हणजे महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, धोाकदायक व्यक्ती, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, वाळु तस्कर, व अत्यावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे, दृक श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे (व्हिडीओ पायरेसी) असे विद्यातक कृत्य करणा-या व्यक्तींना आळा घालण्याबाबत एम.पी.डी.ए. कायद्यान्वये त्याचे गुन्हेगारी व धोकादायक कृत्यांना प्रतिबंध करणे आवश्यक होते.
त्यामुळे पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया,यांचे सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व पाचोड पोलिसांनी त्याचे विरुध्द एम.पी.डी.ए कायद्यान्वये कारवाईसाठी प्रस्ताव तयार करून मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, औरंगाबाद यांचे कडे सादर करण्यात आला होता.
यावरून मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी,छत्रपती संभाजीनगर श्री दिलीप स्वामी यांनी दिनांक 26/3/2024 रोजी आरोपी ग्यानसिंग शिवलाल चव्हाण वय 45 वर्षे रा. पारुंडी तांडा ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर याचे विरूध्द एम.पी.डी.ए अधिनियम 1981 चे कलम 3 (1) अन्वये स्थानबध्दतेचा आदेश पारित केला. त्यावरुन त्यास *दिनांक 27/03/2024 रोजी स्थानबध्दतेचे आदेश तामिल करून मध्यवर्ती कारागृह,हर्सुल येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक मनीष कलवानीया,अपर पोलिस अधीक्षक,सुनिल कृष्णा लांजेवार,यांचे मार्गदर्शनाखाली ,उपविभागिय पोलिस अधिकारी,पैठण डॉ.सिध्देश्वर भोरे,स्था.गु.शा. चे पोलिस निरीक्षक सतिश वाघ, सहा पोनि शरदचंद्र रोडगे,पाचोड, पोशि दिपक सुरोसे यांनी केली आहे.