धरपकड : वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध करण्यासाठी धाराशिव पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन…
धरपकड : वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध करण्यासाठी धाराशिव पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन…
धाराशिव (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, पेट्रोलपंप रॉबरी, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध करण्यासाठी योग्य ती खबरदारी म्हणून आगामी काळात होणाऱ्या निवडणूका, सण-उत्सव, जयंतीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशान्वये संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेसंबंधी आरोपींचा तसेच विविध गुन्ह्यातील पाहीजे, फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी लक्ष्मी पारधीपीढी, तेरखेडा येथे (दि.03मार्च) रोजी 04.00 ते 09.00 वा.सु. कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते.
या नमुद कोंबिंग ऑपरेशन दरम्यान खालील 06 संशयीत इसमांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. 1) संतोष लाला काळे, (वय 34 वर्षे), 2) प्रशांत उर्फ सचिन बापू पवार, (वय 25 वर्षे), 3) राजेंद्र उर्फ राजा बप्पा काळे, (वय 30 वर्षे), 4) अभिजीत उर्फ तावऱ्या शंकर पवार, (वय 28 वर्षे), 5) आर्यन उर्फ काळ्या अमोल काळे, (वय 27 वर्षे), 6) विकास उर्फ बहिऱ्या मच्छिंद्र काळे, (वय 27 वर्षे), सर्व रा.लक्ष्मी पारधी पीढी, तेरखेडा, वर नमुद इसमांकडे चौकशी केली असता नमुद इसम हे पो. ठाणे येरमाळा, गुरनं 31/2024 कलम 395 भादवि, व पो.ठाणे येरमाळा गुरनं 32/2024 353, 332, 34 भ.दं.वि.सं. मधील पाहीजे आरोपी असल्याची माहिती प्राप्त झाली. तसेच यातील आरोपी क्र 1) पो. ठाणे नळदुर्ग गुरनं 234/2021 कलम 457, 380 भा.दं.वि.सं. व गुरनं 201/2021 कलम 392 भा.दं.वि.सं., येरमाळा पो. ठाणे गुरनं 143/19 कलम395, 397 भा.दं.वि.सं. मध्ये पाहीजे आरोपी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच आरोपी क्र 03 हा पो.ठाणे येरमाळा गुरनं 131/2022 कलम 394, 427 भा.दं.वि.सं. मधील पाहीजे आरोपी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
अशा प्रकारे सदर कोंबिंग ऑपरेशन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, पो.ठाणे धाराशिव शहर, पो.ठाणे धाराशिव ग्रामीण, पो.ठाणे आनंदनगर व पोलीस नियंत्रण कक्ष, धाराशिव येथील एकुण 6 पोलीस निरीक्षक, 6 सहाय्यक पोलीस निरीक्षक,01 पोलीस उप निरीक्षक, 50 पुरुष पोलीस अंमलदार, 22 महिला पोलीस अंमलदार, 12 गृह रक्षक दलाचे जवान, 11 सरकारी वाहने व त्यांचे चालक यांनी राबविले होते.