गोंडपिपरी येथे नाकाबंदी दरम्यान देशी-विदेशी दारूसह ५.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त; कारचालक अटकेत

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गोंडपिपरी: चंद्रपूर जिल्ह्यातील बेकायदेशीर दारू वाहतूक व विक्रीवर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजीत आमले यांनी दिले होते. या आदेशानुसार गोंडपिपरी पोलिसांनी ५ सप्टेंबर २०२६ रोजी मोठी कारवाई करत एका चारचाकी वाहनातून अवैध दारू जप्त केली आहे.

गुप्त माहितीवरून कारवाई



५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास गोंडपिपरी ते आष्टी रोडवरील मौजा तारसा बस स्टॉपजवळ पोलीस पथक नाकाबंदी करत होते. यावेळी गोंडपिपरीवरून आष्टीकडे एका सिल्व्हर रंगाच्या मारुती सुझुकी डिझायर कारमधून (क्रमांक MH 34 BR 2243) विनापरवाना देशी व विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली.

कारची झडती आणि जप्त मुद्देमाल



बातमीच्या आधारे पोलिसांनी पाळत ठेवून संशयित कार थांबवली. वाहनाची कायदेशीर तपासणी केली असता कारच्या डिक्कीमध्ये खालील मुद्देमाल आढळून आला:

  • देशी दारू: रॉकेट कंपनीची संत्रा देशी दारू (९० मि.ली. च्या २८० निपा) – मूल्य ₹११,२००/- (प्रति निपा ₹४०/-)



  • बिअर: हायवर्ड्स ५००० कंपनीचे प्रीमियम स्ट्रॉन्ग टिन बिअर (५०० मि.ली. चे ६० नग) – मूल्य ₹८,१००/- (प्रति बिअर ₹१३५/-)

  • चारचाकी वाहन: दारू वाहतुकीसाठी वापरलेली सिल्व्हर रंगाची मारुती सुझुकी डिझायर कार (MH 34 BR 2243) – मूल्य ₹५,००,०००/-



एकूण जप्त मुद्देमाल: ₹५,१९,३००/-

आरोपीवर गुन्हा दाखल

या प्रकरणी कारचालक संघर्ष शंभू रामटेके (वय २३ वर्षे, रा. इंदिरा नगर, मूळ रोड, चंद्रपूर) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गोंडपिपरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) आणि ९८(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई करणारे पोलीस पथक

सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार मुन्नेश्वर रात्रे, पोलीस अंमलदार अतुल तोडासे, राजू पंचफुलीवार, निलेश तुमाने आणि प्रवीण कडूकर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!