
शेगाव मध्ये अनैतिक देह व्यापारावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड…
शेगाव मध्ये अनैतिक देह व्यापारावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड…
शेगाव (प्रतिनिधी) – गेल्या काही महिन्यांपासून शेगाव मध्ये मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय तसेच देह व्यापार मध्ये वाढ झाली होती या मध्ये युवकांचा जास्त सहभाग असल्याने तरुण पिढी आहारी गेली आहे. संत नगरीमध्ये भक्तीच्या नावावर येणारे तरुण तरुणी कडून असे कृत्य म्हणजे सामाजिक दृष्टीने विघातकपणा म्हणावा लागेल. काही अपवाद वगळता शहरातील बहुतांश गेस्ट हाऊस लॉजेस मध्ये अनैतिक देह व्यापार चालवण्यात येत आहे. या वर गुन्हे शाखेने धाड टाकून 5 जणांवर कारवाई करून महिलांची सुटका केली आहे.


श्री.संत गजानन महाराज मंदिरासाठी संपुर्ण भारतात सुप्रसिध्द असलेल्या शेगांव शहरात काही समाजकंटक ईसम हे बाहेर गावातील गरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून, त्यांचे परिस्थीतीचा गैरफायदा घेवून, त्यांना वेगवेगळे आमिषे दाखवून, स्वतःच्या आर्थीक फायद्यासाठी शेगांव येथे बोलावून, त्यांचे कडून देहव्यापार सारखे काम करुन घेत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. सदर अनुषंगाने, असे कृत्य करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून त्यांचेवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करणे तसेच यामध्ये फसवणूक झालेल्या महिलांची सुटका करण्याबाबत पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांना आदेशीत केले होते. सदर संबंधाने पोनि. अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी, स्था.गु.शा. बुलढाणा यांनी अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदारांची पथके तयार करुन, त्यांना शेगांव शहरामध्ये अनैतीक व्यापार करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून, त्यांचेवर कारवाई करणेबाबत सुचित केले होते.

या बाबत अधिक माहिती अशी की, सदर प्रमाणे, (दि.08मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय खबर मिळाली की, शेगांव शहर येथे काही ईसम हे काही मुलींना हजर ठेवून, त्यांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास प्रवृत्त करुन, एखादी जागा उपलब्ध करुन, त्यांचे कडून देहव्यापार करुन घेतात. या वरुन स्था.गु.शा. चे पथकाने शेगांव शहर येथे डमी ग्राहक तयार करुन, नियोजीतपणे सापळा कारवाई करुन, दोन पिडीत महिलांसह खालील आरोपींना पकडले. पकडलेल्या आरोपींची झडती घेतली असता, त्यांचे जवळ खालील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला. सदर प्रकरणी पो.स्टे. शेगांव शहर येथे कलम 4, 5, 6 स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, 1956 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या मध्ये आरोपी नामे (1) प्रेम गणेश लहाने (वय 20 वर्षे), रा.जवळा ता.शेगांव, (2) सुरज चिंचोलकर रा.शेगांव, ता.शेगांव, (3) अमोल प्रकाश बांगर (वय 21 वर्षे), रा.बावणबीर, ता.संग्रामपूर, (4) सुमित सखाराम जाधव (वय 21 वर्षे), रा.शेगांव, ता.शेगांव, (5) सागर अनिल सारवान (वय 19 वर्षे), रा.शेगांव ता.शेगांव यांचेवर कारवाई करून (1) महिला (वय 27 वर्षे), रा.कल्याण, (2) महिला (21 वर्षे), रा.मुंब्रा, जि.ठाणे यांची सुटका केली आहे. या कारवाईत (1) मोबाईल-03 नग, किंमत- 30,000/-रुपये, (2) मोटार सायकल-02 किंमत 90,000/-रुपये, (3) नगदी-4,600/-रुपये (4) व ईतर मुद्देमाल, असा एकूण 1,24,690/-रुपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत ठाकरे, पोलिस स्टेशन शेगांव शहर यांचे कडून करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक सुनिल कडासने,अपर पोलिस अधीक्षक खामगाव, अशोक थोरात अपर पोलिस अधिक्षक, बुलढाणा बी.बी महामुनी , आदेशाने व मार्गदर्शनाखाली, पोनि. अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी, सपोनि. आशिष चेचरे, सफौ. गजानन माळी, पोहवा. राजेंद्र टेकाळे, नापोशि गणेश पाटील, पोशि विक्रांत इंगळे, मपोशि. अनुराधा उगले, चापोहवा. समाधान टेकाळे, चापोना. विजय मुंढे यांच्या पथकाने पार पाडली आहे.


