गुन्हे शाखा युनिट क्र. २ ने केले बसमध्ये महिला कंडक्टरकडून १० हजारांची तिकीट मशिन हिसकावणारा जेरबंद

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


नागपुरात बसमध्ये महिला कंडक्टरकडून १० हजार रुपयांची तिकीट काढणारी मशिन बळजबरीने हिसकावणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्र. २ ने केले जेरबंद

सविस्तर बातमी:

  • घटनेची वेळ व ठिकाण: ही घटना दिनांक २१.१०.२०२६ रोजी दुपारी ३:०० ते ३:३० वाजताच्या दरम्यान घडली. ब्राह्मणणी फाटा ते सीताबर्डी दरम्यान धावणाऱ्या बसमध्ये (बस क्रमांक एम.एच. ४० डी.सी. ०४६८) ही घटना घडली.





  • घटनेचे स्वरूप: फिर्यादी श्रीमती स्नेहा गणेश खिरडकर (वय २७ वर्षे, रा. नागपूर) या बसमध्ये कंडक्टर म्हणून कर्तव्य बजावत असताना, गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील आदिवासी नर्मदा कॉलनी बसस्टॉपवरून एका तरुणाने बसमध्ये प्रवेश केला. त्याने २० रुपयांची नोट देऊन तिकीट काढले. फिर्यादीने त्याला १६ रुपयांचे तिकीट देऊन उर्वरित ४ रुपयांची चिल्लर नसल्याने थोड्या वेळाने देण्याचे सांगितले.



  • जबरी चोरी: नर्मदा कॉलनी बसस्थानकावर बस थांबताच फिर्यादीने बसचा दरवाजा उघडला असता, त्या मुलाने फिर्यादीच्या हातातील अंदाजे १०,००० रुपये किमतीची तिकीट काढण्याची मशिन (ETM) जबरदस्तीने हिसकावून तिथून पळ काढला. याप्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.



पोलिसांची कारवाई व आरोपीला अटक:

  • गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट क्र. २ च्या अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या माहितीवरून सापळा रचला.

  • पोलिसांनी आरोपी प्रेम उर्फ दादू विजय पाटील (वय २० वर्षे, रा. भिवसनखोरी, चितामण नगर, गिट्टीखदान, नागपूर) याला कळमेश्वर पोलीस ठाणे हद्दीतून ताब्यात घेतले.



  • कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील काळी व केसरी रंगाची तिकीट काढण्याची मशिन (किंमत अंदाजे १०,००० रुपये) जप्त करण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी आरोपीला गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मार्गदर्शन:

सदरची ही यशस्वी कामगिरी नागपूर शहर पोलीस आयुक्त  विश्वास नांगरे पाटील, सह-पोलिस आयुक्त  नविणचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल, तसेच सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनखाली मपोनि श्रीमती शुभांगी देशमुख, सपोनि चेतन बोरखेडे, पोउपनि मनोज राऊत आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!