वैजापुर येथील कुख्यात गुन्हेगारास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वैजापुर येथील फरार असलेला कुख्यात गुन्हेगारास एम.पी.डी.ए कायद्यान्वये जेरबंद करुन, एक वर्षासाठी हर्सुल कारागृहात केले स्थानबध्द…

छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांनी वैजापुर तालुक्यात सातत्याने गुन्हेगारी कारवाई करून नागरिकांमध्ये दहशत माजवणा-या कुख्यात गुन्हेगाराला एम.पी.डी.ए. कायद्याचे अंतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी हर्सुल कारागृहात स्थानबध्द केले आहे





याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक यांनी गुन्हेगाराविरूध्द कठोर भुमिका घेवुन आतापर्यंत एकुण 13 गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. खाली एक वर्षासाठी स्थानबध्द करून गुन्हेगांराच्या मुसक्या आवळल्या आहेत.त्यात आणखी एका गुन्हेगाराची भर पडली  पोलिस ठाणे वैजापुर हद्दीतील ईसम अमोल अविनाश कुंदे वय 20 रा.एकरखा ता.राहता जि. अहदमनगर ह.मु. चिकटगाव, ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर याचे विरूध्द पोलिस ठाणे वैजापुर व अहमदनगर जिल्हयातील पोलिस ठाणे लोणी, संगमनेर शहर, आश्वी, येथे घरफोडी, जबरी चोरी, दरोडा व चोरी, दरोड्याची पुर्व तयारी करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, अटकाव करणे, फौजदारी गुन्हयाचा कट करणे असे शरिराविरूध्द व मालाविरूध्दचे गंभीर गुन्हे करित असतांना बेकायदेशिर कृत्ये करून धाकदपटशा करण्याचा सवईचा असुन लोकांना धमकावुन पैसे मागतो नाही दिले तर मारहाण करतो त्याच्या अशा कृत्यामुळे सामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातारण निर्माण झाले होते



त्याचे गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी त्याचेविरूध्द वेळोवेळी प्रतिबंध कारवाई सुध्दा करण्यात आली होती. परंतु याबाबीचा त्याच्येवर काहि एक परिणाम न होता त्याने त्याच्या गुन्हेगारी व धोकादायक कारवाई चढत्या क्रमाने चालुच ठेवलेल्या होत्या.
अशा प्रकारे गंभीर गुन्हे दाखल असुन त्याचेवर कलम 110 (ई) (ग) फौजदार प्रक्रिया संहिता अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.



त्याअनुषंगाने एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ॲक्टिविटी) कायद्यानुसार म्हणजे महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, धोाकदायक व्यक्ती, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, वाळु तस्कर, व अत्यावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे, दृक श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे (व्हिडीओ पायरेसी) असे विद्यातक कृत्य करणा-या व्यक्तींना आळा घालण्याबाबत एम.पी.डी.ए. कायद्यान्वये त्याचे गुन्हेगारी व धोकादायक कृत्यांना प्रतिबंध करणे आवश्यक होते.  त्यामुळे पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांचे सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व वैजापुर पोलिसांनी त्याचे विरुध्द एम.पी.डी.ए कायद्यान्वये कारवाईसाठी प्रस्ताव तयार करून मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांचे कडे सादर करण्यात आला होता.

सदर प्रस्तावास मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 10/11/2023 रोजी आरोपी अमोल अविनाश कुंदे वय 20 वर्षे रा.एकरखा ता.राहता जि. अहदमनगर ह.मु. चिकटगाव, ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर याचे विरूध्द एम.पी.डी.ए अधिनियम 1981 चे कलम 3 (1), 3(2) अन्वये स्थानबध्दतेचा आदेश पारित केला होता. परंतु तेव्हा पासुन तो फरार झाल्याने मिळुन येत नव्हता. वैजापुर पोलिसांनी त्याचा कसोशिने शोध घेवुन त्याला दिनांक 26/06/2024 रोजी नाशिक शहरातुन  ताब्यात घेवुन त्यास दिनांक 26/06/2024 रोजी स्थानबध्दतेचे आदेश तामिल करून मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक मनीष कलवानीया,अपर पोलिस अधीक्षक सुनिल कृष्णा लांजेवार यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी वैजापुर महक स्वामी, पोलिस निरीक्षक सतिश वाघ, सहा पोलिस निरीक्षक, सुधीर मोटे  स्था.गु.शा,पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोउपनि प्रविण पाटील, वैजापुर, पोलिस अंमलदार दिपक सुरोशे, स्थागुशा, प्रशांत गिते, रावसाहेब राऊते, प्रकाश लघाने, शरद बोबडे, वाल्मिक बनगे, पोस्टे वैजापुर यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!