अट्टल दोन घरफोड्यांना आणि शेती साहित्यांची चोरी करणाऱ्या विधीसंघर्ष बालकांना अटक…
अट्टल दोन घरफोड्यांना आणि शेती साहित्यांची चोरी करणाऱ्या विधीसंघर्ष बालकांना अटक…
धाराशिव (प्रतिनिधी) – पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने आणि विशेष पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून दिवसा घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल घरफोड्यांना स्थानिक गुन्हे शाखेने आणि शेती साहित्यांची, शेत मालाची चोरी करणाऱ्या ३ विधीसंघर्ष बालकांना पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अटक केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखा अभिषेक बाबुराव मारवाडकर, (वय ३६ वर्षे), रा.शाहु नगर तावडे प्लॉट धाराशिव ता.जि.धाराशिव यांच्या राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने (दि.०३फेब्रुवारी) रोजी ०८.३० ते १२.३० वा.सु तोडून आत प्रवेश करुन कपाटातील २४.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम ३५,०००/- असा एकुण १,०८,०००/-₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे अभिषेक मारवाडकर यांनी (दि.०३फेब्रुवारी) रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो.ठाणे येथे गुरनं २६/२०२४ कलम ४५४, ३८० भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला होता.
गुन्हा तपासादरम्यान पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणनेकामी धाराशिव जिल्हयातील आंबी, भुम, वाशी व येरमाळा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पेट्रोलिंग दरम्यान आंबी पोलीस ठाणे हद्दीत पोलिस आले असता गोपनीय माहिती मिळाली की, आंबी ते आनाळा रोडवर दोन इसम एक मोटर सायकलसह थांबलेले आहेत. त्यावर पथकाने लागलीच त्या ठिकाणी जाऊन बातमी प्रमाणे दोन इसम व एक मोटरसायकल सह मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) नवनाथ उर्फ मटक्या ईश्वर भोसले, (वय ३१ वर्षे), रा.बेलगाव ता.कर्जत, जि.अहमदनगर, २) शाम उत्तम पवार, (वय ३२ वर्षे), रा.पाचंग्री, ता.पाटोदा जि. बीड असे सांगितले. त्यावर पथकाने नवनाथ भोसले याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमतः पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की मी व माझे तीन भाऊ यांनी मागील दीड वर्षातील काळात माझ्या बजाज मोटरसायकलवरुन धाराशिव शहरात दिवसा बंद असलेले घरे ज्या मध्ये आनंदनगर पो.ठाणे गुरनं २६/२०२४ कलम ४५४, ३८०, पो.ठाणे भुम गुरनं ५३/२०२४, २८/२०२३ कलम ४५४, ३८०, पो.ठाणे वाशी ०२/२०२४ ४५४, ३८०, १२/२०२४, ९१/२०२४, १८८/२०२३, १८९/२०२३, २५४/२०२३, २७८/२०२३, ३२१/२०२३ कलम ४५४, ३८०, भा.दं.वि.सं., पो.ठाणे येरमाळा ८५/२०२४ कलम ४५४, ३८० भा.दं.वि.सं., पो.ठाणे आंबी १४०/२०२३ कलम ४५४, ३८० भा.दं.वि.सं. असे एकुण १३ गुन्हे केल्याची कबुली दिली. तेव्हा पोलिसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली बजाज कंपनीची मोटरसायकल ९०,०००१ किंमतीची हस्तगत केली. नमुद आरोपीस चोरीच्या मोटरसायकलसह आनंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिस नमुद आरोपीचा शोध घेत आहेत.
अशा प्रकारे सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलिस हावलदार- शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फहरान पठाण, चालक नितीन भोसले, रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली आहे.
शेतमालाची चोरी करणारे ३ विधीसंघर्ष बालक विशेष पथकाच्या ताब्यात –
धारशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढून चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सपोनि अमोल मोरे, सपोनि सचिन खटके, पोहेकॉ विनोद जानरव, पोहेकॉ निंबाळकर, पोहेकॉ वाघमारे, पोहेका सय्यद, पोना जाधवर, पोकों अरसेवाड, यांचे पथक मालाविषयक गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना (दि.०६एप्रिल) रोजी पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, काही इसम आपसिंगा ता.तुळजापूर येथे चोरीच्या उद्देशाने साहित्य घेवून विक्रीसाठी थांबले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरील पथक बातमीच्या ठिकाणी रवाना होवून बातमी मधील विधीसंघर्ष तीन बालकास ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमतः पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही तिघांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली. त्यावर विशेष पथकाने त्यांच्या ताब्यात असलेले २१० किलो दोन पोते सोयाबीन, बळीराम नांगर, १३० किलो ज्वारी असा एकुण १९,८५०१ किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्याची खात्री करता ती पोलिस ठाणे तुळजापूर गुरंन १५५/२०२४, १५६/२०२४, १५७/२०२४, १५८/२०२४ कलम ३७९ भा.दं.वि.सं. या गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद विधीसंघर्ष तीन बालकास चोरीच्या मालासह तुळजापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
अशा प्रकारे सदरची कामगीरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, विशेष पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ विनोद जानराव, समाधान वाघमारे, अमोल निंबाळकर, हुसेन सय्यद, पोलिस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर, पोलिस अंमलदार रवींद्र आरसेवाड यांच्या पथकाने केली आहे.