धाराशिव पोलिसांची मोठी करवाई! काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

धाराशिव पोलिसांची मोठी करवाई! काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला…

धाराशिव (प्रतिक भोसले) – पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, उपविभाग धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली अवैद्य धांद्यांची माहिती काढुन कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक हे (दि.१४फेब्रुवारी रोजी) गस्तीस असताना रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार आहे अशी गोपनीय माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी जाऊन थांबले तेव्हा त्या ठिकाणी एक महिंद्रा पिकअप वाहन भरधाव वेगात येताना दिसले, पोलिसांनी त्याला थांबवले पण सुरुवातीला चालक काही थांबला नाही तेव्हा पोलिसांना संशय आला. म्हणुन पोलिसांनी शेवटी थांबवून वाहनाची झडती घेतली, तेव्हा त्या मध्ये सुतळी पोत्यावर स्वच्छ भारत अभियान, एक कदम स्वच्छता की ओर असे लिहिलेले तांदळाचे पोते दिसले. या बाबत चालकाला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर आम्ही विक्रीसाठी घेऊन जात असून, अजून असेच पोते साळुंके नगर येथील आमले यांच्या घराजवळ एका वाहनात आहेत असे त्याने सांगितले, त्या वर पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता तेथे सुद्धा एका पिकअप वाहनामध्ये पोते दिसले. तेव्हा पथकाची खात्री झाली. या मध्ये पथकाने शासकीय वितरण अवस्थेतील तांदळाचे पोते आणि दोन वाहने असा एकूण ११ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय धाराशिव येथे कार्यरत असलेले पोहेकॉ. नागेशहरी गरड (नेमणुक पोलिस ठाणे धाराशिव शहर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी – सतिश शितोळे, रा.रामनगर, धाराशिव, ता.जि.धाराशिव आणि इम्रान शेख, रा.समर्थनगर, धाराशिव, ता.जि.धाराशिव यांच्यावर भा.दं.सं. कलम अत्यावश्यक वस्तू अधिनियम ३ आणि ७ अंतर्गत धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि त्यांच्या सोबत सपोनि माळी, पोना. पाटील, पोकॉ. ठाकुर, पोकॉ. सय्यद, आणि पोकॉ. गरड हे सगळे अवैद्य धंदयाची माहिती घेऊन कारवाईसाठी गस्तीस होते. त्या वेळी त्यांना धाराशिव ते वरुडा जाणारे रोडवर शिंदे कॉलेज येथून रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार आहे अशी माहिती मिळाली होती. म्हणून ते धाराशिव ते वरुडा जाणारे रोडवर शिंदे कॉलेज जवळ पुढे रोडवर थांबले होते. तेथे पोलिसांची जीप बघून एक महिंद्रा पिकअप क्र. एम.एच १४-जी.डी.-२९०१ या पिकअप च्या चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगात चालवल्याने पोलिसांना संशय आल्याने त्यास थांबवुन त्याची पाहणी केली असता त्यामध्ये सुतळी पोत्यावर स्वच्छ भारत अभियान एक कदम स्वच्छता की ओर असे व इंग्लिश मध्ये गव्हर्मेंट ऑफ पंजाब क्रॉप इअर २०२२-२०२३ असे लेबल असलेले तांदळाचे पोते दिसुन आले.



सदर पिकअप चालकास त्याचे नाव-गाव व सदर पोत्यांबाबत विचारपुस केली असता त्याने आपले नाव इमान सलाउद्दीन शेख, (वय ३४ वर्षे), रा.समर्थनगर बसस्थानकाच्या पाठीमागे वरूडा रोड धाराशिव असे सांगुन सदर तांदुळ हा साळुंकेनगर मधील माणिक आबासाहेब आमले यांच्या घरातुन आणलेला असुन त्या ठिकाणी आणखीन तांदुळ आहे असे सांगितले. त्यावरून सपोनि. माळी यांनी सोबतचे अंमलदार पोकॉ. ठाकुर आणि पोकॉ गरड यांना त्या ठिकाणी पाठवुन खात्री केली असता, सदर ठिकाणी माणिक आबासाहेब आमले यांच्या घरासमोर दारात एम.एच. क्र. २५-पी-१७२३ या वाहनात सुतळी पोत्यावर स्वच्छ भारत अभियान एक कदम स्वच्छता की ओर असे व इंग्लिश मध्ये गवर्नमेंट ऑफ पंजाब क्रॉप इअर २०२२-२०२३ असे लेबल असलेले पोते दिसून आले, पाठीमागे घराचे आंगणातील रिकाम्या जागेत काळया रंगाचे पोत्यात तांदुळ व बाजुच्या खोलीत सुतळी पोत्यावर स्वच्छ भारत अभियान एक कदम स्वच्छता की ओर असे व इंग्लिश मध्ये गवर्नमेंट ऑफ पंजाब क्रॉप इअर २०२२-२०२३ असे लेबल असलेले रिकामे पोते असल्याचे कळले. तेव्हा सपोनि माळी यांनी दोन्ही अंमलदार यांना पहारा देणे कामी त्याच ठिकाणी थांबण्याचे आदेश दिले.



त्या नंतर सदर दोन वाहनांची पंचासमक्ष झडती घेवुन
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय धाराशिव येथे आणले सदर वाहनातील तांदुळ तसेच साळुंके नगर येथील आमले यांच्या घरी असलेला तांदुळ हा रेशनचा शासकीय वितरण व्यवस्थेतील असल्याने सदर माला बाबत पुढील कायदेशिर कार्यवाही करणे करीता तहसिलदार धाराशिव यांना संपर्क करून सदर मुद्देमाला बाबत पुढील कायदेशिर कार्यवाही करणे बाबत कळविले असता, तहसिल कार्यालयातील कोणीही प्रतिनिधी न आल्यामुळे सपोनि. माळी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग धाराशिव यांच्या आदेशाने सदर ठिकाणी पंचासमक्ष जाऊन घटनास्थळाचा व तांदळाचा वेगळा पंचनामा केला, सदर ठिकाणी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील रेशनचा माल काळया बाजारात विक्री करण्याचे उद्देशाने साठवणुक केलेला व काळया बाजारात विक्री करण्यासाठी जात असलेला दिसून आला होता.

छोटा हत्ती वाहनातील मुद्देमाल पुढील प्रमाणे –

१) ५,००,०००/- रु. एका पांढ-या रंगाचे एम.एच. क्र. २५-पी-१७२३ क्रमांकाचे छोटा हत्ती वाहन ज्यामध्ये काळया बाजारात विक्री करण्यासाठी भरलेला तांदुळ असलेला कि.अं.) ४८,०००/- रु. शासकीय वितरण व्यवस्थेतील सुतळी पोत्यावर २ स्वच्छ भारत अभियान एक पंजाब क्रॉप इअर, एक कदम स्वच्छता की ओर असे आणि गवर्नमेंट ऑफ २०२३ असे लेबल असलेले प्रत्येकी ५० किलो वजनाचे प्रत्येकी १२०० रूपये किंमतीचे एकुण ४० पोते (किं.अं.)

२) ७३५/- रु. शासकीय वितरण व्यवस्थेतील सुतळी पोत्यावर स्वच्छ भारत अभियान एक कदम स्वच्छता की ओर असे आणि गवर्नमेंट ऑफ पंजाब क्रॉप इअर २०२२-२०२३ असे लेबल असलेले ४९ रिकामे सुतळी पोते प्रत्येकी किंमत १५ रु. प्रमाणे (जु.वा., कि.अं.)

३) ४८,०००/- रु. शासकीय वितरण व्यवस्थेतील सुतळी पोत्यातील तांदुळ हिरवे पट्टे असलेल्या काळ्या रंगाच्या प्लास्टीक बारदान्यामध्ये भरलेला एकुण ४० पोते प्रत्येकी ५० किलो वजनाचे प्रत्येकी १२०० रु. प्रमाणे एकुण ४० पोते (किं.अं.)

पिकअप वाहनातील मुद्देमाल पुढील प्रमाणे –

४) ५,००,०००/- रु. एक पांढ-या रंगाचे एम.एच. १४-जी.डी.-२९०१ क्रमांकाचे पिकअप वाहन ज्यामध्ये काळया बाजारात विक्री करण्यासाठी भरलेला तांदुळ असलेला (कि.अं.) ७९,२००/- रु. शासकीय वितरण व्यवस्थेतील सुतळी पोत्यावर स्वच्छ भारत अभियान एक कदम स्वच्छता की ओर असे आणि गवर्नमेंट ऑफ पंजाब क्रॉप इअर २०२२-२०२३ असे लेबल असलेले प्रत्येकी ५० किलो वजनाचे प्रत्येकी १२०० रु. किंमतीचे एकुण ६६ पोते (किं.अं.) असा एकूण जवळपास ११,७५,९३५/- रु. मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे.

सदरचा माल हा महाराष्ट शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील रेशनचा माल तांदुळ, साळुंके नगर येथे सतिश शितोळे रा. रामनगर धाराशिव यांनी काळया बाजारात विक्री करण्यासाठी साठवुन ठेवलेला व त्यातील काही तांदुळ इसम नामे इमान सलाउद्दीन शेख (वय ३४) धंदा पिकअप चालक, रा.समर्थनगर धाराशिव हा पिकअप वाहन क्र. एम.एच.-14-जीडी २९०१ मध्ये वाहतुक करून जास्त भावाने काळया बाजारात विक्री करण्यासाठी घेवुन जात असताना (दि.14फेब्रुवारी) रोजी सकाळी ११.०० वा.सु. धाराशिव ते वरुडा रोडवरील शिंदे कॉलेजचे पुढे विटभट्टी जवळ ११,७५,९३५/-रु. चे मुद्देमालासह मिळुन आलेला असल्यामुळे, इसम नामे सतिश शितोळे रा.रामनगर धाराशिव आणि इमान सलाउद्दीन शेख (वय ३४), धंदा पिकअप चालक, रा.समर्थनगर धाराशिव या दोघांवर फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!