पोलिस आणि अन्न-औषध प्रशासनाची अवैध गुटखा विरोधी कारवाई; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पोलिस आणि अन्न-औषध प्रशासनाची अवैध गुटखा विरोधी कारवाई; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त…

धाराशिव (प्रतिक भोसले) – अन्न व औषध प्रशासन आणि तामलवाडी पोलिस यांच्या संयुक्त पथकाला लाखोंचा अवैध गुटखा जप्त करण्यात यश आले आहे. पथकाने शाकंबरी हॉटेल समोर, तुळजापूर ते सोलापूर एन.एच. ५२ महामार्गावर धडक कारवाई करत ट्रकसह तब्बल १८ लाख ४३ हजार २०० रु. अवैध गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन, धाराशिव या कार्यालयात कार्यरत असणारे अन्न सुरक्षा अधिकारी सुहास मंडलिक, (वय ५२ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालक समीर सरवर पाशा, (वय २६ वर्षे), रा. दुबलगुंडी, हुमनाबाद, राज्य. कर्नाटक याच्यावर तामलवाडी पोलिस ठाण्यात भा.दं.सं.कलम १८८,२७२,२७३, ३२८, यांच्या सह अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम ३०(२), २७(३) ई आणि ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राज्य शासनाने मागे काढलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात (दि.२०जुलै २०२३) पासून राज्यात गुटखा, पानमसाला किंवा अंतिमतः गुटखा किंवा पानमसाला गठीत होऊ शकेल असे पदार्थ, सुगंधित किंवा स्वादिष्ट सुपारी / तंबाखू आदींचे उत्पादन / साठा / वितरण / वाहतूक / तसेच विक्री यावर बंदी घातलेली होती. म्हणून त्या साठी अन्न सुरक्षा अधिकारी कर्तव्यावर होते. पो.स्टे. तामलवाडी, ता. तुळजापूर, जि.धाराशिव यांनी दिलेल्या जा.क्र. ३८८/२०२४ च्या पत्रानुसार (दि.२६फेब्रुवारी) रोजी दुपारी पावणे एक वा.सू.पोलीस स्टेशन तामलवाडी, येथे हजर होऊन (दि.२४फेब्रुवारी) रोजी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार शाकंबरी हॉटेल समोर, तुळजापूर ते सोलापूर एन.एच ५२ रोड, तामलवाडी, ता.तुळजापूर येथे २१:३० वा.सू. त्यांना अशोक लेलैंड ट्रक वाहन क्र. एम.एच.४३ यु १५२३ मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला साठा आढळून आल्याने ते वाहन पोलीस स्टेशनला आणले होते. सदर वाहनाची तपासणी केली असता त्या मधे १) बादशाह गुटखा एका मोठ्या गोणीमध्ये ६ छोट्या पिशव्या प्रत्येक पिशवी मध्ये प्रत्येकी ६४ पाकीटे अशा एकूण ४० गोणी १५३६० पाकिटे १२०/-रु. असे एकुण १८,४३,२००/- २) अशोक लेलँड ट्रक वाहन क्र.एम.एच.४३ यु १५२३ जुने वापरते किं.अं. रु.१०,००,०००/- असा एकुण २८,४३,२००/- रु. मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे.



या कारवाईत राज्यामध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व तत्सम अन्नपदार्थाच्या विक्री, साठा, उत्पादन, वाहतुकीस बंदी घातलेली आहे. याबाबत विक्रेत्यास ज्ञात असुन देखील त्यांनी प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्रीसाठी साठवणूक व विक्री करुन महाराष्ट्र शासन यांची अधिसूचना क्र. असुमाअ/अधिसुचना/४९६/७,(दि.१८जुलै २०२३) चे उल्लंघन केले असल्याचे दिसून आले आहे.



सदर साठा हा मानवी सेवनास हानिकारक असल्याने साठा मालकाच्या संमतीने नष्ट करण्याच्या उद्देशाने अनौपचारिक नमुने घेऊन उर्वरित साठा पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात घेण्यात आला व त्या बाबत तपासणी अहवाल व मेमोरँडम तयार केला. त्यावर पंच साक्षीदाराची व हजर व्यक्तीची स्वाक्षरी घेतली. सदर अन्नपदार्थ कोठून खरेदी केला याबाबत विचारणा केली असता हजर व्यक्तीने सदर बाबत कोणतीही माहिती अथवा खरेदी बिले दाखविले नसल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन आणि उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शैलेश पवार हे करत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!