पोलिस अधिक्षकाच्या आदेशाने जुगारावर कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

धाराशिव- पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे  आदेशाने व नवनीत कॅावत अपर पोलिस अधिक्षक, धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली ,उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांचे सुचनेनुसार पोलिस ठाणे आनंदनगर चे प्रभारी अधिकारी बांगर हे पोलिस ठाणे आनंदनगर हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करत असताना दि. २४.०९.२०२३ रोजी गप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, छायादिप मंगल कार्यालयाचे पाठीमागील भागात प्रदीप आण्णासाहेब निंबाळकर यांचे राहते घरी बंद खोलीत धाराशिव येथे काही इसम तिरट नावाचे जुगार खेळत व खेळवित आहे सदर ठिकाणी ०८.५५ वा. सु छापा मारला असता. सदर ठिकाणी मिळून आलेले इसम नामे

१) स्वप्नील अनिल शिंदे, वय २१ वर्षे,





२) उमंग मधुकर निंबाळकर, वय ५० वर्षे,



३) दिनेश भानुदास काकडे, वय ५२ वर्षे,



४) संदीप नानासाहेब पवार, वय ४० वर्षे,

५) अझरोद्दीन खयामोद्दीन शेख वय ३६ वर्षे,

६) सरुराज मकसुद कुरेशी, वय २९ वर्षे,

७) अजय राम नरवडे,

८) प्रदीप आण्णासाहेब निंबाळकर,

९) आमन करीम शेख, वय १९ वर्षे

हे सर्व लोक तिरट जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले. नमूद जुगार अड्ड्यावरुन तिरट जुगाराचे साहित्यासह मोबाईल फोन, चारचाकी वाहन,मोटरसायकल व रोख रक्कम असा एकुण २४,१७,५३० ₹ किं चा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असुन नमूद
व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४, ५ अंतर्गत आनंदनगर पो. ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षीक नवनीत  कॉवत यांच्या आदेशावरुन उपविभागीय पोलिस अधिकारी . स्वप्नील राठोड, आनंदनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी
अधिकारी  बांगर, सपोनि  शिंदे, चव्हाण, खरड, माळी पोलिस हावलदार- माने, शेंडगे,हांगे,  शेख, महिला पोलिस हावलदार नदाफ पोलिस नाईक- बांगर,  बांगर पोलिस अंमलदार कागदे, महिला पोलिस अंमलदार  शिंदे तसेच उपविभागीय कार्यालयातील पोलिस
हावलदार गरड, पोलीस अमंलदार – सय्यद यांच्या पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!