धाराशिव पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे पुढाकाराने पोलिस वसाहतीत सुरु करण्यात आले शेंद्रीय भाजीपाला विक्री केंद्र….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

धाराशिव(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने धाराशिव येथील जिल्हा पोलिस मुख्यालयाजवळील सबसिडीअरी कॅन्टीनसमोर सेंद्रीय भाजीपाला आणि फळे विक्रीच्या स्टॉलचे उदघाटन शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी करण्यात आले.या कार्यक्रमास उपविभागीय पोलिस अधिकारी (गृह) सदाशिव शेलार राखीव पोलिस निरीक्षक अरविंद दुबे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर गोरे मोबाईल ऍपचे राहूल सिंग प्रगतिशील शेतकरी शिवमुर्ती साठे, धनंजय शिंगाडे, टाटा सामाजिक संस्थेचे गणेश चादरे,महेश जमाले, नानासाहेब पाटील, ज्ञानेश्वर धनके आदि उपस्थित होते यावेळी सेंद्रिय शेती करणारे शेतकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले

यावेळी बोलताना जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले की, येथील भाजीपाला केंद्रात सेंद्रीय पद्धतीने पिकविलेला स्वच्छ, रसायनमुक्त ताजा भाजीपाला आणि फळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री होणार असल्याने ग्राहकांना कमी दरात भाजीपाला आणि फळे मिळणार आहेत. याचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी केले.





*पर्यावरणप्रेमी पोलीस अधीक्षक*



पर्यावरणप्रेमी अतुल कुलकर्णी यांच्या माध्यमातून पर्यावरणप्रेमी जिल्हा पोलिस अधीक्षक लाभले आहेत. जिल्ह्यातील वनसंख्या लक्षात घेऊन त्यांनी आजपर्यंत धाराशिव, तुळजापूर, कळंब, भूम तालुक्यात स्वतः वृक्ष लागवड करून नागरीकांना पर्यावरण संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले आहे. तसेच भूगर्भातील पाणी पातळी वाढावी म्हणून विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून तलाव खोलीकरण, विहीर पुनर्भरण अशी कामे केली आहेत. त्यांच्या या कामाचे धाराशिव जिल्हावासीयामधून कौतुक होत आहे.



*फळझाडांच्या लागवडीस प्राधान्य*

जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी धाराशिव तालुक्यातील वरवंटी, कळंब तालुक्यातील येरमाळा, भूम तालुक्यातील हाडोंग्री येथे वृक्षारोपण करताना फळझाडांच्या लागवडीस प्राधान्य दिले. त्यामुळे आज या झाडांची जपणूक तेथील ग्रामस्थ देखील स्वतःहुन करत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक  कुलकर्णी यांच्या परिश्रमाचे चीज झाल्याचे आता दिसून येत आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!