
तुळजापूरात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
तुळजापूरात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
धाराशिव (प्रतिनिधी) – तुळजापूर तालुक्यातील सावरगाव शिवारात बेकायदेशीर मळीची वाहतूक करणारा पिकअप राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला आहे. या मध्ये 3 हजार किलो मळी आणि महिंद्रा पिकअप असा एकूण जवळपास 7 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र या मध्ये वाहनचालक पळुन गेल्याने त्यास फरार घोषीत करुन त्याच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ,ई), 70,72,80,81,83, व 108 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी राज्य उत्पादन शुल्क, म.रा. मुंबई यांच्या आदेशान्वये, संचालक (अं.व.दं.) सुनिल चव्हाण म.रा. मुंबई, संचालक (मळी व मद्यार्क) विश्वनाथ इंदिसे म.रा. मुंबई, विभागीय उपआयुक्त पी.एच. पवार रा.ऊ.शु. छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर, यांच्या आदेशानुसार व अधीक्षक, गणेश बारगजे, राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तुळजापुर हे मौजे सावरगाव शिवारात काटी ते सावरगाव रोडवर वाहतुक करीत असताना एक इसम चोरुन मळीची वाहतुक करणार असल्याची खात्रीलाय माहिती मिळाली माहिती मिळताच त्या ठिकाणी पथक गेले असता काही वेळाने एक चारचाकी वाहन येताना दिसले. त्याला थांबण्याचा इशारा केला असता वाहनचालकाने गाडी उभी न करता सदरचे वाहन जोराने घेवुन गेला. सदर वाहनाचा मोठ्या शिताफीने पाठलाग करत असताना वाहनचालकाने वाहन पुढे थांबवुन तो अंधाराचा फायदा घेवुन पसार झाला. त्यानंतर सदरच्या वाहनाची तपासणी केली असता सदरच्या वाहनामध्ये विना वाहतुक पास मळीचा साठा मिळुन आला. सदर वाहनचालक पळुन गेल्याने त्यास फरार घोषीत करुन त्याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ,ई), 70,72,80,81,83, व 108 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर ठिकाणाहून 1) 60 प्लॅस्टीकच्या कॅनमध्ये अं. 3000 किलो मळी, त्याची कॅनसह किंमत. रु.48,000/-, 2) महिंद्रा अँड महिंद्रा पिकअप FB PS 1.7TXL कंपनीचे चारचाकी वाहन ज्याचा वाहन क्र. MH 13 DQ 1184 त्याची अं. किंमत रु. 7,50,000/- या मध्ये एकुण 7,98,000/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे सुधारित अधिनियम 2005 चे कलम 65 (अ, ई), 70,72,80,81,83, व 108 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपीस फरार घोषीत करण्यात आले आहे.

अशा प्रकारे सदरची कारवाई तुळजापूर येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे सुनिल पी.कांबळे, दुय्यम निरीक्षक, तुळजापुर व अभिजीत बोंगाणे, जवान यांनी केलेली आहे. पुढील तपास सुनिल कांबळे दुय्यम निरीक्षक रा.ऊ. शु.तुळजापूर हे करीत आहेत.


