
उमरगा पोलिसांची अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई, लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त…
उमरगा पोलिसांची अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई, लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त…
धाराशिव (प्रतिनिधी) – उमरगा तालुक्यात वाढती गुटखा-तंबाखू तस्करी पाहता, अवैध गुटखा वाहतूकीवर लक्ष ठेऊन कार्यवाही करणे संदर्भात पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी उमरगा येथील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्या नुसार उमरगा पोलिस कारवाई साठी गस्तिस असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करून 27 लाख 15 हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उमरगा पोलिस ठाण्यात गुरनं 301/2024 भा.द.वि. सं. कलम 328, 188, 272, 273, सह 26(2)(i), 26(2)(iv), 27 (3) (e), 30(2) दंडनिय कलम 59 अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.14मे) रोजी दुपारी पोलिस उप अधीक्षक शेलार, उपविभागीय अधिकारी उमरगा, यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की, पोलिस ठाणे उमरगा हद्दीत हॉटेल शौर्यवाडा ते चौरस्ता कडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग बायपास उमरगा येथे वाहन क्र. एमएच 14 ईएम 9650 अशोक लिलँड टॅम्पो या वाहना मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटख्याची वाहतुक होणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलिस पथकाने नमुद ठिकाणी जाऊन सदर वाहन चेक केले असता सदर वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. यातील आरोपी नामे- अर्जुन सुर्यकांत केदार, (वय 35 वर्षे), रा.राजेवाडी पो.महाळगी, ता.चाकुर, जि.लातुर याचे ताब्यात नमुद वाहनात गोवा गुटखा काथ पावडर, 540 किलो, सुगंधी सुपारी गिक्षर 3,600 किलो, स्ट्रीप रोड गोवा गुटखा 1,880 किलो, रिकामे पाउचेस वजीर गुटखा 240 किलो, रिकामे पाउचेस गोवा 1,000 गुटखा 570 किलो हे सर्व वाहना सह असा एकुण 27, 15,100/-₹ किंमतीचा पानमसाला, गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळून आल्याने तो जप्त करुन आरोपी नामे- अर्जुन सुर्यकांत केदार, (वय 35 वर्षे), रा.राजेवाडी पो.महाळगी ता.चाकुर, जि.लातुर यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुध्द पोलिस ठाणे उमरगा येथे गुरनं 301/2024 भा.द.वि. सं. कलम 328, 188, 272, 273, सह 26(2)(i), 26(2)(iv), 27 (3) (e), 30(2) दंडनिय कलम 59 अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक पुजरवाड हे करत आहेत

अशा प्रकारे सदर कामगिरी ही पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी उमरगा, पोलिस उपअधीक्षक शेलार यांचे मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक पारेकर, पोलिस उप निरीक्षक पुजरवाड, सुहास मंडलीक अन्न व सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन (म.रा.) धाराशिव, उपविभागीय अधिकारी उमरगा, कार्यालयाचे अधिकारी अंमलदार पोलिस ठाणे उमरगा चे पोलीस अंमलदार यांचे पथकाने केली आहे.



