
छत्रपती संभाजी नगर येथील चोरीची बस धुळे स्थागुशाने केली हस्तगत…
छत्रपती संभाजी नगर येथील चोरीची बस धुळे स्थागुशाने केली हस्तगत…
धुळे (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी नगर येथुन चोरीला गेलेली बस हस्तगत करण्यात धुळे पोलिसांना यश मिळाले आहे. मिळालेली गोपनीय माहिती, तांत्रीक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपास यांच्या आधारावर गुन्ह्याची उकल करत बस हस्तगत करून गुन्हयाच्या पुढील तपासकामी प्रभारी अधिकारी, छत्रपती संभाजी नगर यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.


या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, (दि.०४फेब्रुवारी) रोजी पोनि. दत्तात्रय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना गुप्त बातमीव्दारे माहिती मिळाली आहे की, चाळीसगाव रोड चौफुली जवळील विठ्ठल नगर येथे एक पांढऱ्या रंगाची एम.एच.२० डी.डी. ०१९५ क्रमांकाची संशयीत बस उभी आहे. अशी माहिती प्राप्त झाल्याने पोनि. दत्तात्रय शिंदे यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याबाबत संबंधितांना आदेशीत केले होते.

त्या अनुषंगाने स्थागुशाचे पथकाने चाळीसगाव रोड चौफुलीजवळील विठ्ठल नगर येथे जाऊन एक पांढऱ्या रंगाची एम.एच.२० डी.डी. ०१९५ क्रमांकाची संशयीत बस ताब्यात घेतली. ५,००,०००/- रु. किंमतीचा अशोक लेलँड कंपनीची पांढऱ्या रंगाची बस तिचा क्रमांक एम.एच. २० डी.डी. ०१९५ असा एकुण ५,००,०००/- रु. किंमतीची वरील नमुद वर्णनाची बस मिळुन आल्याने सदर बस बाबत खात्री करता, सिडको पोलिस ठाणे येथे भाग ५ गुरनं. ३१/२०२४ भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजुन आले. त्या नंतर सदर बस चोरीची असल्याची खात्री झाल्याने जप्त करुन गुन्हयाच्या पुढील तपासकामी प्रभारी अधिकारी, छत्रपती संभाजी नगर यांचे ताब्यात देण्यात आली आहे.

अशा प्रकारे सदरची कारवाई श्रीकांत धिवरे पोलिस अधीक्षक धुळे, किशोर काळे, अपर पोलिस अधीक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे स्थागुशा धुळे, संजय पाटील, श्याम निकम, पोहेकॉ मच्छिंद्र पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, संतोष हिरे, प्रकाश सोनार, योगेश चव्हाण, संदीप पाटील, प्रल्हाद वाघ, तुषार सुर्यवंशी, योगेश साळवे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी केलेली आहे.


