
ओमनी कारमधुन धुळे शहरात विक्रीसाठी येणारा गुटखा स्थागुशा पथकाने पकडला…
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला लाखो रुपयाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखे कडुन जप्त…
धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पान मसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने तस्करी होत असल्याने पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, धुळे यांनी पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना सुचना देऊन कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते.


सदर आदेशानुसार माहिती प्राप्त करीत असतांना दि. (२१) रोजी पो.निरी. दत्तात्रय शिंदे, स्थागुशा धुळे यांना गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, एक इसम त्याच्या ताब्यातील मारोती व्हॅन क्रमांक एम. एच. १८ डब्ल्यु ११५२ या मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाला भरुन साक्री कडुन तिरंगा चौक, धुळे कडे येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक, स्थागुशा, धुळे यांनी लागलीच पथकास नमुद बातमीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई कामी आदेशीत केले.
त्या अनुषंगाने सदर पथकाने तिरंगा चौकात सापळा रचुन दबा धरुन बसलेत. ८० फुटी रोड कडुन मारोती व्हॅन क्रमांक एम.एच.१८ डब्ल्यु ११५२ येतांना दिसल्याने सदर वाहनास थांबवुन त्यावरील चालकास त्याचे नावं गांव विचारता त्याने त्याचे नांव मोहम्मंद युसुफ मोहम्मद याकुब वय ३४ रा. तिरंगा चौक, पुवन टॉवर धुळे असे सांगीतले. सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात खालील नमुद वर्णनाचा व किंमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा मिळुन आला तो,
०१) ३८,८९६/-रु. किं. चा विमल पान मसाल्याच्या एकुण ४ मोठया गोण्या प्रत्येक गोणीत ५२ पुडे एका पुडयाची किंमत १८७ रुपये प्रमाणे
०२) २१,६२० /-रु. किं. चा विमल पान मसाल्याच्या एकुण २ मोठया गोण्या प्रत्येक गोणीत एकुण २० मोटे पुडे एका पुडयाची किं. ४७०/- रुपये असे एकुण १८,८००/- व १० लहान पुडे एका पुडयाची किंमत १४१ रुपये असे एकुण २८२० रुपये असे एकुण २१,६२०/-

०३) ६०००/-रु.किं.चा व्ही वन तंबाखुची १ मोठी गोणी त्यात १० प्लॅस्टीकच्या लहान गोण्या एका प्लॅस्टीकच्या गोणीत एकुण २० पुडे एका पुडयाची किंमत ३० रुपये असे एकुण ६०००/- रु.

०४) ३१,६८०/-रु.किं.चा विमल पान मसाल्याच्या एकुण ८ लहान गोण्या प्रत्येक गोणीत २० पुडे एका पुडयाची किंमत १९८ रुपये प्रमाणे
०५) १७१६/- रु.किं. ची व्ही वन तंबाखुची १ लहान गोणी त्यात एकुण ५२ पुडे एका पुडयाची किंमत ३३ रुपये प्रमाणे
०६) २,५०,०००/- रु.कि.ची मारोती व्हॅन क्रमांक एम.एच. १८डब्ल्यु १९५२ जुवा.
असा एकुण ३,४९,९१२/- रु. किंमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला धुळे शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करतांना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द भादंवि कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चेकलम २६ (२) (iv), २७ (३) (d), २७ (३) (e), ३० (२) (a), ३ (१) (zz) (i) व ३ (१) (zz) (v) चे उल्लंघन कलम ५९ (i) प्रमाणे कायदेशिर कारवाई करण्याची तजविज सुरु आहे.
सदरची कारवाई श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक,किशोर काळे, अपर पोलिस अधीक्षक,यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पो. निरी. दत्तात्रयशिंदे, पोउपनि कैलास दामोदर,प्रकाश पाटील, संजय पाटील, पोहवा सुरेश भालेराव, संतोष हिरे, रविंद्र माळी, संदीप पाटील, संदीप सरग, चेतन बोरसे, पोना रविकिरण राठोड, पोकॉ सुशिल शेंडे,पोशि निलेश पोतदार, गुणवंत पाटील, हर्षल चौधरी अशांनी केली आहे.


