गडचिरोली: २६ लाखांच्या मुद्देमालासह अवैध दारू आणि वाहने जप्त!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई: २६ लाखांच्या मुद्देमालासह अवैध दारू व चारचाकी वाहने जप्त!

गडचिरोली (दिनांक ३० जून २०२६): गडचिरोली जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी असतानाही छुप्या मार्गाने होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीविरोधात गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या आदेशान्वये, आरमोरी पोलीस पथकाने सापळा रचून २६,२५,९००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक  अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

२९ जून २०२६ रोजी आरमोरीचे पोलीस निरीक्षक कैलास गवते यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, राहुल टेंभुर्णे (रा. आरमोरी) हा त्याच्या साथीदारांसह चारचाकी वाहनातून अवैध देशी, विदेशी आणि हातभट्टी मोहा दारूची वाहतूक करत आहे. ही दारू आरमोरी येथील आझाद चौकातील जिओ टॉवरजवळील खुल्या मैदानात चारचाकी वाहनांमध्ये लपवून ठेवण्यात आली होती.



या माहितीच्या आधारे आरमोरी पोलीस पथकाने घटनास्थळावर छापा टाकला. तिथे प्लास्टिक कॅनसह आढळलेल्या दोन संशयितांची चौकशी केली असता, त्यांनी आपली नावे प्रविण भाऊराव खोब्रागडे (वय ३१, रा. फुले वार्ड, आरमोरी) आणि रुपेश रेखचंद ठवरे (वय २९, रा. आझाद चौक, आरमोरी) अशी सांगितली. मैदानात उभ्या असलेल्या तीन चारचाकी वाहनांबाबत विचारले असता, त्यांनी ही वाहने राहुल टेंभूर्णे याची असल्याचे कबूल केले.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण किंमत: २६,२५,९००/- रुपये)

वाहनांची पंचांसमक्ष तपासणी केली असता पोलिसांना खालील मुद्देमाल आढळून आला:



  • दारू साठा (किंमत ६,५५,९००/- रुपये):

    हेवर्ड्स ५००० प्रीमियम स्ट्रांग बिअर: २४० नग (किंमत ७२,०००/- रुपये)



    • रॉयल चॅलेंज प्रीमियम व्हिस्की: ४८ निपा (किंमत १६,८००/- रुपये)

    • रॉयल स्टॅग विदेशी दारू: ४८ निपा (किंमत १६,८००/- रुपये) आणि २ लिटरच्या ६ बाटल्या व इतर १०३ बाटल्या (एकूण किंमत ३,९८,१००/- रुपये)



    • टुबर्ग प्रीमियम स्ट्रांग बिअर: २४ नग (किंमत ७,२००/- रुपये)

    • रॉकेट बडीशेप व रॉकेट संत्रा देशी दारू: एकूण ८०० बाटल्या (किंमत ६४,०००/- रुपये)

    • टायगर संत्रा देशी दारू: ७०० बाटल्या (किंमत ५६,०००/- रुपये)

    • हातभट्टी मोहा दारू: ४० लिटर (किंमत ८,०००/- रुपये)

  • जप्त केलेली वाहने (किंमत १९,७०,०००/- रुपये):

    महिंद्रा टी.यू.व्ही. ३०० (किंमत ७,००,०००/- रुपये)

    • निसान मॅग्नाईट (किंमत ५,००,०००/- रुपये)

    • महिंद्रा स्कॉर्पिओ (किंमत ७,००,०००/- रुपये)

    • सुझुकी बर्गमन स्ट्रीट दुचाकी (किंमत ७०,०००/- रुपये)

गुन्हा दाखल व अटक

याप्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ०२६४/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांनुसार प्रवीण खोब्रागडे, रुपेश ठवरे आणि मुख्य आरोपी राहुल कैलास टेंभुर्णे (वय ४२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या प्रवीण खोब्रागडे आणि रुपेश ठवरे यांना न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे करत आहेत.

जून महिन्यात १.९४ कोटींचा मुद्देमाल जप्त!

गडचिरोली पोलीस दलाने अवैध व्यवसायांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. एकट्या जून २०२६ या महिन्यात जिल्हाभरात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीचे २८७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ०१ कोटी ९४ लाख रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आगामी काळात ही कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी दिला आहे.

कारवाई करणारे पथक:

आरमोरीचे प्रभारी अधिकारी पोनि. कैलास गवते, पोउपनि. नरेश सहारे व पोलीस अंमलदार पिल्लेवान, वालदे, तोरे, सराटे, झाडे, कुमोटी आणि बारहते यांनी यशस्वीरित्या पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!