
जहाल नक्षलवादी मिस्सो कवडो गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात आठवडाभरातील दुसरी धडक कार्यवाही…
गडचिरोली – सवीस्तर व्रुत्त असे की आज दिनांक 17/10/2023 रोजी जहाल माओवादी मेस्सो गिल्लू कवडो वय 50 वर्षे, रा. रेखाभटाळ तह. एटापल्ली जि. गडचिरोली (एसीएम) माड सप्लाय टीम हा मौजा जाजावंडी – दोड्डुर जंगल परिसरात वास्तव्यास असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन विशेष अभियान पथक, पोस्टे गट्टा (जां) पोलिस पार्टी व सिआरपीएफ 191 बटालियनच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून त्यास अटक केली. त्यास सन 2023 साली मौजा हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलिस माओवादी चकमकीवरुन पोस्टे एटापल्ली जि. गडचिरोली येथे दाखल अप. क्र. 0013/2023 कलम 307, 353, 143, 148, 149, 120 (ब) भादवी, 3/25, 5/27 भारतीय हत्यार कायदा, 3, 4 भारतीय स्फोटक कायदा, 135 महाराष्ट्र पोलिस कायदा व 13, 16, 18 (अ) युएपीए ॲक्ट अन्वये गुन्ह्रात अटक करण्यात आलेली आहे.
सदर जहाल माओवादी मेस्सो कवडो हा माओवाद्यांच्या सप्लाय टीममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. तो नेहमी माओवाद्यांना विविध स्फोटक साहित्य, दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करत असल्याने त्याची अटक गडचिरोली पोलिस दलासाठी महत्वाची ठरलेली आहे . तो दिनांक 14/10/2023 रोजी अटक झालेला जहाल माओवादी डीव्हीसी चैतुराम ऊर्फ सुक्कू वत्ते कोरसा याच्या सोबत काम करत होता. या दोघांना चार दिवसांत अटक केल्याने माओवाद्यांच्या पुरवठा साखळीला मोठा धक्का बसला आहे.


अटक जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती

मेस्सो गिल्लू कवडो

दलममधील कार्यकाळ
* सन 2017 च्या आधी माओवाद्यांना जीवनावश्यक सामान आणून देणे, पोलीस पार्टी आल्याचे निरोप देणे इ. काम करत होता.
* सन 2017 ला सप्लाय टीम/स्टाफ टीममध्ये सदस्य या पदावर भरती होऊन सन 2023 पर्यंत कार्यरत.
*सन 2023 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन आजपर्यंत कार्यरत.
कार्यकाळात केलेले गुन्हे
चकमक – 2
* माहे नोव्हे./डिसेंबर 2017 मध्ये मुस्फर्शी जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.
* माहे मार्च 2023 मध्ये मौजा मौजा हिक्केर (म.रा.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.
खुन – 2
* सन 2021/22 मध्ये मध्ये मौजा रामनटोला तह. एटापल्ली जि. गडचिरोली येथे झालेल्या गाव पाटलाच्या खुनात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता.
* सन 2022 मध्ये पुन्हा मौजा दोड्डुर तह. एटापल्ली जि. गडचिरोली येथे झालेल्या गाव पाटलाच्या खुनात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता.
* सन 2021 मध्ये मौजा ताडबैली, जि. कांकेर (छ.ग.) येथील मोबाईल टॉवर जाळपोळ करण्यात त्याचा सहभाग होता.
महाराष्ट्र शासनाने मेस्सो गिल्लू कवडो याच्या अटकेवर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 72 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे .
सदरची यशस्वी कार्यवाही पोलिस अधिक्षक अधीक्षक निलोत्पल अपर पोलिस अधीक्षक (अभियान) . अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता अपर पोलिस अधीक्षक, अहेरी यतीश देशमुख . यांचे मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलिस अधिकारी, हेडरी . बापूराव दडस आणि सीआरपीएफ ई/191 बटालीयनचे असिंस्टंट कमांडन्ट मोहीत कुमार यांचे नेतृत्वात पार पडली. यावेळी पोलिस अधीक्षक यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे .


