दोन जहाल महीला नक्षलवादी व नक्षल समर्थकास गडचिरोली पोलिसांनी केली अटक,त्यांचेवर होते ५.५० लाखाचे बक्षीस….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

दोन जहाल महिला नक्षलवादी व एका नक्षल खबरीस गडचिरोली पोलिसांनी केली अटक,यांच्यावर होते ५.५० लाखाचे बक्षीस…..





गडचिरोली(प्रतिनिधी) – फेब्रुवारी ते मे दरम्यान नक्षलवादी हे टीसीओसी कालावधी साजरा करतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलिस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवादी व टिटोळा गावच्या पोलिस पाटलाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या एका नक्षल खबरीस आज दिनांक 07/04/2024 रोजी अटक केली
याबाबत सवीस्तर वृत्त असे की, आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या पाश्र्वभूमीवर विघातक कृत्य करण्याच्या तसेच सुरक्षा दलाच्या हालचालींचा आढावा घेण्याच्या हेतूने जहाल महिला नक्षलवादी 1) काजल ऊर्फ सिंधू गावडे, वय 28 वर्षे, रा. कचलेर तह. एटापल्ली, जि. गडचिरोली व 2) गीता ऊर्फ सुकली कोरचा, वय 31 वर्षे, रा. रामनटोला, तह. एटापल्ली जि. गडचिरोली ह्रा गडचिरोली-कांकेर (छ.ग.) सिमेवरील पोस्टे पिपली बुर्गी हद्दीतील मौजा जवेली जंगल परिसरात संशयितरित्या फिरत आहेत. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान, पोस्टे पिपली बुर्गी पोस्ट पार्टीचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलिस बल जी -192 बटा. च्या जवानांनी सदर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवून त्यांना ताब्यात घेतले. अधिक तपासात असे दिसून आले की, सन 2020 साली मौजा कोपर्शी – पोयारकोटी जंगल परिसरात पोलिस – माओवादी चकमक झाली ज्यात गडचिरोली पोलिस दलातील एक अधिकारी व एक जवान शहिद झाले होते. सदर चकमकीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर चकमकीच्या अनुषंगाने पोस्टे भामरागड येथे दाखल अप. क्र. 19/2020 कलम 302, 307, 353, 332, 143, 147, 148, 149, 120 (ब) भादवि, सहकलम 5/27, 5/28 भाहका, 3,4 भास्फोका मध्ये अटक करण्यात आलेली आहे.



यासोबतच मागील वर्षी सन 2023 मध्ये मौजा टिटोळा ते पामाजीगुडा जंगल परिसरात झालेल्या माहे नोव्हेंबर 2023 मध्ये टिटोळा पोलिस पाटील याचे हत्येच्या अनुषंगाने पोस्टे एटापल्ली येथे दाखल गुन्ह्रातील फरार असलेला आरोपी नक्षल खबरी पिसा पांडू नरोटे, रा. झारेवाडा, तह. एटापल्ली, जि. गडचिरोली हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो गिलनगुडा जंगल परिसरात लपून बसलेला असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोस्टे गट्टा (जां.) पोस्ट पार्टी व केंद्रीय राखीव पोलीस बल ई -191 बटा. च्या जवानांनी विशेष अभियान राबवून त्यास पोस्टे एटापल्ली येथे दाखल अप. क्र. 76/2023 कलम 302, 364, 143, 147, 148, 149, 120 (ब) भादवि. सहकलम 3/25 भाहका, 135 मपोका या गुन्ह्रामध्ये आज रोजी ताब्यात घेऊन अटक करण्याची प्रक्रिया चालु आहे.



१)काजल ऊर्फ सिंधू गावडे ही  2012 मध्ये प्लाटुन क्र. 55 मध्ये सदस्य या पदावर भरती होऊन सन 2019 पर्यंत कार्यरत होती.
नंतर  2019 मध्ये कंपनी क्र. 04 मध्ये बदली होऊन सन 2020 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती त्यानंतर 2020 पासुन डीव्हीसी (डिव्हीजनल कमीटी) स्टाफ टीम/प्रेस टीम मध्ये सदस्य पदावर आतापर्यंत कार्यरत होती.या कालावधीत तिने आतापर्यंत 7 चकमकीमधे तिचा प्रत्यक्ष सहभाग होता त्यात 2019 मध्ये मौजा नारकसा जंगलमौजा दराची सिंदेसुर जंगल, मौजा बोधीनटोला,
2020 मध्ये मौजा किसनेली पहाडी जंगल परिसरात गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता. 2021 मध्ये मौजा फुलकोडो जंगल, मौजा खोब्राामेंढा जंगल, मौजा मोरचूल जंगल परिसरात गडचिरोली पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.त्याचप्रमाणे 2019 मध्ये मौजा कनेली जंगल,.मौजा पुसेर साखरदेव जंगल परिसरातील जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.

२) गीता ऊर्फ सुकली कोरचा- ही सन 2018 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन  सप्टेंबर 2020 पर्यंत कार्यरत होती.नंतर तिची माड एरीया मध्ये बदली होऊन सदस्य पदावर आतापर्यंत कार्यरत होती.यादरम्यान तीने 3 चकमकीमधे तिचा प्रत्याक्ष सहभाग होता 2019 मध्ये मौजा मोरोमेट्टा – नेलगुंडा जंगल,2020 मध्ये कोपर्शी-पोयारकोटी जंगल परिसरात पोलीसांसोबत चकमकीमध्ये गडचिरोली पोलिस दलातील एक अधिकारी व एक जवान शहिद झाले होते, 2021 मध्ये कोपर्शी जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता, 2020 मध्ये मौजा कोठी येथे झालेल्या एका पोलिस जवानाच्या हत्येमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता, 2021 मध्ये कोठी ते भामरागड रोडवर झालेल्या एका निरपराध इसमाच्या हत्येमध्ये तिचा सहभाग होता.

३)नक्षल खबरी पिसा पांडू नरोटे – हा  2018 पासुन गावात राहुन नक्षल खबरी म्हणून नक्षलवादी यांना राशन आणून देणे, सेंट्री ड्युटी करणे, त्यांची हत्यारे लपवून सुरक्षीत ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती नक्षलवाद्यांना पुरविणे, पोलिस पार्टीबद्दल माहिती देणे तसेच नक्षलवाद्यांची पत्रके जनतेपर्यत पोहचविणे व इतर काम करीत होता. 2021 पासून हा कमांडर म्हणून काम करीत होता.यादरम्यान 2022 मध्ये झारेवाडा येथील निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.2022 मध्ये गोरगुट्टा  2023 मध्ये मौजा टिटोळा ते पामाजीगुडा जंगल परिसरात झालेल्या टिटोळा पोलिस पाटलाच्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. 2019 मधील लोकसभा निवडणूकीदरम्यान मौजा टिटोळा गावात स्फोटके जमिनीत पुरुन ठेवण्यात नक्षलवाद्यांना मदत केली होती.

गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे  जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 77 नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आलेले आहे. सदरच्या दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान). यतिश देशमुख,अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता,. अपर पोलिस अधीक्षक, अहेरी, एम. रमेश , यांचे मार्गदर्शनाखाली सीआरपीएफचे ई-191 बटा. चे असीस्टंट कमांडेन्ट मोहित कुमार, सीआरपीएफ जी-192 बटा. चे असीस्टंट कमांडेन्ट  दिपक दास, पोस्टे पिपली बुर्गीचे प्रभारी अधिकारी वैभव रुपवते, पोस्टे गट्टा (जां.) चे प्रभारी अधिकारी चेतन परदेशी तसेच विशेष अभियान पथकाच्या जवानांनी पार पडली.

पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!