
गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान,२२ लाखाचे होते बक्षीस…
गडचिरोली पोलिस व नक्षलवादी यांच्यात भामरागड तालुक्यातील जंगलात झालेल्या चकमकीत तीन जहाल नक्षलवादी ठार,यांचेवर शासनाचे २२ लक्ष रु चे बक्षीस होते…


गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (13) मे रोजी सकाळी टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभुमीवर विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने पेरमिली दलमचे काही नक्षलवादी भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकुन असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिस दलातील विशेष अभियान पथकाचे दोन पथक तातडीने सदर जंगल परिसरात नक्षलवाद विरोधी अभियान राबविणेकामी रवाना करण्यात आले. सदर नक्षलवादविरोधी अभियान राबवित असतांना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता, नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरंक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर 01 पुरुष व 02 महिला नक्षलवादी मृत अवस्थेत आढळले असुन सदर मृतक नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे.ती खालीलप्रमाणे
1) वासु समर कोरचा, रा. गोडीया, पूर्व बस्तर एरीया (छ.ग.) (डीव्हीसीएम) हा पेरमिली दलमचा कमांडर म्हनुन काम करत होता त्याचेवर खुन.व दरोड्यासारखे ७ गंभीर गुन्हे दाखल असुन
शासनाने त्याचेवर एकुण 16 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

2) रेश्मा मडकाम, वय 25 वर्षे, रा. बस्तर एरीया (छ.ग.)ही कंपनी सदस्य म्हनुन नुकतीच पेरिमिली दलममधे सामील झाली होती हिचेवर सुध्दा खुन,चकमकीसारखे 06 गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्रामध्ये तिचा प्रत्यक्ष समावेश होता.हिचेवरसुध्दा शासनाने एकुण 04 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
3) कमला मडावी, वय 24 वर्षे, रा. दक्षिण बस्तर एरीया (छ.ग.)ही पेरमिली दलाची सदस्य म्हनुन कार्यरत होती हीचेवरसुध्दा खुन व चकमकीसारखे 07 गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्रामध्ये तिचा प्रत्यक्ष समावेश होता. शासनाने हिचेवरसुध्दा एकुण 02 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
यासोबतच सदर घटनास्थळावरुन 01 नग एके 47 रायफल, 01 नग कार्बाइन रायफल, 01 नग इन्सास रायफल व इतर स्फोटक साहीत्यासह मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य हस्तगत करण्यात पोलिस दलास यश आले आहे.
सदर अभियान हे विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, संदिप पाटील,पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल,पोलिस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता,अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश, पोलिस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले
सी-60 कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे. तसेच सदर भागात नक्षलवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करुन आपले जिवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.


