नक्षलवादी व गडचिरोली पोलिस यांच्यात झालेल्या चकमकीत नक्षलवादी पसार,नक्षली साहीत्य केले जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,काल संध्याकाळी एक विश्वासार्ह माहिती मिळाली की काही सशस्त्र नक्षलवादी कॅडर कांकेर – नारायणपूर – गडचिरोली जाणाऱ्या त्रिकोणी रस्त्याच्या पॉइंटवरील वांगेतुरीपासून 7 किमी पूर्वेला हिद्दूर गावात विध्वंसक कारवाया करण्यासाठी व नव्याने उघडलेल्या पो.स्टे.वांगेतुरी आणि पो.म.के.गर्देवाडा या आउट पोस्टची रेकी करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून आहेत
त्यावरून अप्पर पोलिस अधीक्षक अभियान यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चार C-60 पार्ट्यांचा समावेश असलेले एक पथक सदर भागात शोध मोहिमेवर पाठवण्यात आले सदर पथक हिद्दूर गावापूर्वी 500 मीटर अंतरावर असताना त्यांचेवर संध्याकाळी  7.00 वाजता चे दरम्यान  नक्षल्यांकडून जोरदार गोळीबार करण्यात आला त्याला गडचिरोली पोलीस दलाने प्रत्युत्तर दिल्यावर घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले. परिसरात झडती घेतली असता – पिट्टू, स्फोटक साहित्य, वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेटर्स, क्लेमोर माइन्सचे हुक, सोलर पॅनेल आणि नक्षल साहित्य इत्यादी मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत. त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले जात आहे





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!