जहाल नक्षलवादी महेन्द्र वेलाटी गडचिरोली पोलिसांचे ताब्यात,शिताफिने केली अटक..
गडचिरोली – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 02 ते 08 डिसेंबर रोजी दरम्यान माओवादी हे पीएलजीए सप्ताह साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात,त्याअनुषंगाने
दिनांक 06/12/2023 रोजी जहाल माओवादी
महेंन्द्र किष्टय्या वेलादी, वय 32 वर्षे, रा. चेरपल्ली, तह. भोपालपट्टनम, जि. बीजापूर (छत्तीसगड)
हा उपपोस्टे दामरंचा जवळ असलेल्या इंद्रावती नदीजवळ पोलिस पार्टीच्या हालचालींबाबतची माहीती देण्याच्या उद्देशाने फिरत असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान, सीआरपीएफ 9 बटालियन जी कंपणीचे जवान व उपपोस्टे दामरंचा पोलीस पार्टीच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून त्यास अटक केली. अधिक तपासात असे दिसून आले की, तो दामरंचा व मन्नेराजाराम या दोन्ही पोस्ट पार्टीच्या जवानांच्या नियमित कामकाजाच्या हालचालींवर पाळत ठेवून त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने अहेरी दलमच्या माओवाद्यांना माहिती पुरवीत होता. त्याचा 2023 च्या सुरवातीला झालेल्या कापेवंचा ते नैनेर जंगल परिसरात वन अधिकायांवर दरोडा, हल्ला आणि जाळपोळ करण्याच्या घटनेमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता हे उघड झाले आहे. त्यानुसार त्यास उपपोस्टे राजाराम (खां) तह. अहेरी, जि. गडचिरोली येथे दाखल अप. क्र. 01/2023 कलम 397, 332, 353, 341, 324, 323, 120 (ब), 427, 435, 143, 147, 148, 149, 506, 186 भादवी, 3/25 भारतीय हत्यार कायदा, 135 महाराष्ट्र पोलीस कायदा व 07 क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अन्वये गुन्ह्रात अटक करण्यात आलेली आहे.
अटक जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती
त्याचा दलममधील कार्यकाळ हा सन 2009 मध्ये माओवाद्यांच्या सप्लाय टीममध्ये कार्यरत असतांना माओवादी गावाजवळ आल्यावर सेंट्री ड्युटी करिता जाणे तसेच दामरंचा बाजारातून माओवाद्यांना (किराणा, भाजीपाला इ.) सामान पोहचविण्याचे काम करीत होता. त्यानंतर तो सन 2010 पासून नॅशनल पार्क, बीजापूरच्या सॅण्ड्रा भागात सीपीआय (एम.) चा चेरपल्ली आरपीसीचा (रक्षा पार्टी कमीटी) सदस्य होता. पुढे तो नॅशनल पार्क एरिया, बीजापूर येथील सॅण्ड्रा दलममध्ये सदस्य म्हणून काम करत होता त्याने त्याच्या कार्यकाळात 02 चकमकीत सहभाग घेतला होता तसेच डिसेंबर 2017 मध्ये मौजा सॅण्ड्रा जंगल परिसरात झालेल्या चकमकीमधे सुध्दा त्याचा सहभाग होता
डिसेंबर 2022 मध्ये गडचिरोली आणि बीजापूर पोलीसांच्या संयुक्त पथकासोबत मौजा टेकामेट्टा जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये सहभाग होता
तसेच सन 2023 मध्ये मौजा कापेवंचा ते नैनेर जाणारा रोड जंगल परिसरात वन विभागाच्या कर्मचायांना मारहाण व त्यांचे वाहन जाळपोळीच्या गुन्ह्रातही तो होता,मे 2023 रोजी सॅण्ड्रा गावातील एका निरपराध इसमाच्या हत्येमध्ये सहभाग. असल्याचे कळते
म्हनुनच महाराष्ट्र शासनाने महेंन्द्र किष्टय्या वेलादी याच्या अटकेवर 02 लाख रूपयाचे बक्षीसही जाहिर केले होते.
गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 72 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल ,अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख ,अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता ,अपर पोलिस अधीक्षक, अहेरी एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलिस अधीक्षक यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.