अवैध दारु विक्रेत्यांवर अहेरी पोलिसांची बेधडक कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अहेरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कार्यवाहीमधे देशी व विदेशी दारुसह एकुण 20,55,200/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त…

अहेरी(गडचिरोली) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांनाही अवैधरीत्या छुप्या पध्दतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द कडक कार्यवाही तसेच अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत आदेश पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी सर्व प्रभारी यांना दिले होते





त्याअनुषंगाने अहेरी पोलिसांना दिनांक (15) रोजी पोस्टे अहेरी हद्दीतील मौजा आल्लापल्ली येथे एक इसम योगेश अरुणसिंग चव्हाण हा देशी विदेशी दारुची अवैध दारु विक्री करीत आहे. अशी गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे अहेरी येथील प्रभारी अधिकारी पोनि. दशरथ वाघमोडे, पोउपनि काळे, व पोलीस स्टाफसह पोस्टे अहेरी येथून सदर ठिकाणी  पोलीस पथकासह   पोहचताच आरोपी योगेश चव्हान याच्या घराच्या अंगणात एका मारुती सुझुकी कंपनीचे वाहन क्र. एम.एच.–34-ए.एम.–8549 या चारचाकी वाहनामध्ये एकुण 4,57,200/- रुपयांचा दारुच्या पेट्यांनी भरलेला मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला
यासोबतच आलापल्ली येथील दोन इसम चारचाकी वाहनातुन दारुची वाहतुक करणार असल्याची गोपनिय बातमीदारांकडुन खात्रिशीर माहिती मिळाल्याने पोलिस पथकाद्वारे मौजा आलापल्ली परिसरात वाहणाची पाहणी करित असतांना दोन इसम संशयास्पद हालचाल करतांना दिसून आल्याने त्यांचेशी विचारपुस करण्यासाठी जवळ जात असतांना सदर दोन्ही इसम पळुन जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी पोलिसांनी वाहनाजवळ जागीच दोन इसमांना पकडले. त्यानंतर त्यांची विचारपुस केली असता, त्यांचे नाव 1) गुड्डु वर्मा, रा. चंद्रपुर 2) अरविंद हिरामण भांडेकर, रा. येवला तह. व जि. गडचिरोली असे सांगितले व त्यांच्याकडे असलेली एक टाटा कंपनीची इंडीका विस्टा पांढ­र्या रंगाची चारचाकी वाहन क्र. एम.एच-32-सी.-6050 व टर्बो कंपनीची चारचाकी वाहन क्र. एम.एच-24-जे.-9564 या दोन्ही वाहनाची तपासणी केली असता, वाहनामध्ये देशी विदेशी कंपनीची अवैध दारु मिळून आल्याने वाहनासह एकुण किंमत 15,98,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, सदर मुद्देमाल किशोर डांगरे रा. आलापल्ली याचा असून सुलतान शेख रा. चंद्रपुर हा त्याचा पार्टनर असल्याचे निष्पन्न झाले. वरील प्रमाणे एकुण 20,55,200/-  अवैध मुद्देमाल विनापरवाना विक्रीकरीता वाहतुक करतांना मिळुन आल्याने वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपीतांविरुध्द पोलिस स्टेशन अहेरी येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरच्या दोन्ही कार्यवाह्या पोलिस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता,अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख,अपर पोलिस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) एम. रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय  कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे अहेरीचे प्रभारी अधिकारी पोनि.  दशरथ वाघमोडे, पोउपनि. जनार्धन काळे, पोहवा लोहबंरे,बांबोळे, चापोहवा मोहुर्ले, पोशि वडजु दहिफळे, उध्दव पवार,सुरज करपेत यांनी पार पाडल्या.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!