चार्मोशी पोलिसांची गावठी मोहा दारु विरोधात धडक कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

चामोर्शी पोलिसांन जंगमपुर शिवारात वॅाश आऊट मोहीम,मोहा दारुसह एकुण 28,40,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त…

 







चार्मोशी(गडचिरोली) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असून, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हयात अवैध व छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने त्याविरुध्द पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दि.(24) रोजी पोस्टे चामोर्शी हद्दीतील मौजा जंगमपूर जंगल शिवारातील जंगमपूर नाल्याच्या शेजारी 1) जुगल लखन दास, 2) देवदास किसन मंडल, 3) सुब्रातो विश्वास व इतर रा. नेताजी नगर (गाव क्रमांक 74) तह. चामोर्शी, जि. गडचिरोली हे मोहा सडवा फुलाची दारु काढून अवैधरित्या विक्री करत आहेत, अशी गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोस्टे चामोर्शी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विश्वास पुल्लरवार यांच्या नेतृत्वात महिला पोलिस उपनिरीक्षक राधिका शिंदे सह एक पथक चामोर्शी येथून सदर ठिकाणी रवाना करण्यात आले. पोलिस पथक घटनास्थळावर पोहचताच सदर इसम पळून गेले.
त्यानंतर सदर जागेची पाहणी केली असता, घटनास्थळावर 200 लीटर क्षमतेचे 26 प्लॅस्टीकचे ड्रम त्यामध्ये प्रत्येकी 200 लीटर मोहा फुल सडवा असे एकुण पाच हजार दोनशे लीटर अंदाजे किंमत 5,20,000/- चा मुद्देमाल आणि 200 लीटर क्षमतेच्या पांढऱ्या रंगाचे एकुण 116 प्लॅस्टीकच्या थैली त्यामध्ये प्रत्येकी 200 लीटर मोहा सडवा प्रमाणे 23 हजार 400 लीटर अंदाजे किंमत 23,40,000/- मोहा फुल सडवा असे एकुण 28 हजार 400 लीटर अवैध मोहा सडवा बाजार भाव विक्री किंमत 100 रु  प्रती लीटर प्रमाणे एकुण 28,40,000/- चा मुद्देमाल मिळून आला. मुद्देमाल मोक्यावर रीतसर सॅम्पल घेऊन वेळीच घटनास्थळी पंचासमक्ष नष्ट करण्यात आला. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करुन पोस्टे चामोर्शी येथे आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास मपोउपनि. राधिका शिंदे करीत आहेत.



सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक अहेरी (प्राणहिता)  एम. रमेश तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी गडचिरोली  सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वास पुल्लरवार यांचे नेतृत्वात मपोउपनि. राधिका शिंदे, पोहवा व्यंकटेश येलल्ला,पोशि संदिप भिवणकर, मपोशि मनिषा चिताडे, शिल्पा पोटे, चापोशि सिंधराम यांनी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!