निवडनुकीच्या अनुषंगाने LCB ने पकडला शहरात येणारा दारुचा साठा..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने  02 चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण 12,05,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त….





गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याकरीता  दारुविक्रेत्यांकडून छुप्या मार्गाने शेजारील चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्रातून गडचिरोली जिल्ह्रात अवैद्य दारु पुरवठा करून जिल्ह्राच्या विविध भागात पोहचविण्याची दाट शक्यता असते. त्याद्वारे मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकुण निवडणुक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यात अडथळा निर्माण होत असतो म्हनुन पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल यांनी अशांवर कार्यवाही करण्याकरीता आदेशीत केले होते



त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आगामी निवडणुकच्या पाश्वभुमीवर गडचिरोली परिसरात गस्त करीत असतांना दिनांक 12/11/2024 रोजी गोपनिय सुत्रांकडुन माहिती मिळाली की, गडचिरोली शहरातील गोकुळनगर परिसरातील अवैद्य दारु विक्रेता  आकाश भरडकर हा त्याचा साथीदार  रोशन लोखंडे याच्या मदतीने मौजा ब्राम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर येथून गडचिरोली परिसरात अवैद्य देशी व विदेशी दारुची वाहतुक करून आगामी विधानसभा निवडणुकच्या पाश्र्वभुमीवर मनोज मुजुमदार व क्रिष्णा मुजुमदार यांना पुरवठा करणार आहे.



सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने पोरेड्डीवार इंजिनिअरींग कॉलेज, बोदली परिसरात सापळा रचून असतांना खबरेतील दोन वाहने समोरून येतांना दिसताच त्यांना थांबवून वाहनांची तपासणी केली असता, त्यात रॉकेट देशी दारुचे 130  बॉक्स मिळून आले. सदर दारुचे बॉक्स व दारु वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी वाहन असा एकुण 12,05,000/- रु. चा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करून वाहनातील आरोपी आकाश भाऊराव भरडकर, रा. गोकुळनगर, रोशन हरिदास लोखंडे, रा. उंदरी, ता. उमरेड, जि. नागपूर यांना अटक करून त्यांचे व पाहिजे असलेले आरोपी मनोज मुजुमदार, रा. एटापल्ली व क्रिष्णा मुजुमदार, रा. कसनसुर यांचे विरुद्ध पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक श्री. नीलोत्पल,अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि. राहुल आव्हाड यांचे नेतृत्वात पो प्रशांत गरफडे, नामदेव भटारकर, चापोशि दिपक लोणारे यांनी केलेली आहे.

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!