लग्नासाठी मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…
लग्नासाठी मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…
नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपुर मध्ये लग्नासाठी अपहरण करून मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपी हे मुलींना जास्त पगाराची नोकरी लावून देतो असे आमिष देवून फुस लाऊन परराज्यात घेऊन जाऊन लोकांकडून पैसे घेवून तिच्या इच्छेविरूध्द लग्नासाठी विक्री करत होते. अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर तिघांना पोलिसांनी अटक केली असून दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी फिर्यादी कु.वैष्णवी ज्ञानेश्वर नाईक, (वय २० वर्ष), व्यवसाय – खाजगी नोकरी, पत्ता- खानगाव, ता.काटोल जि.नागपूर ह.मु. ईश्वर धुर्वे यांच्या घरी किरायाने, न्यू शांती लेआउट, महाप्रज्ञा बुध्दविहार, गणेश नगर, दाभा चौक, नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गिट्टीखदान पोलिस ठाण्यात भा.दं.सं.३९०/२०२४ कलम ३६६,५०६,३४ भा.द.वी. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या बाबत अधिक माहिती अशी की, पोलिस ठाणे गिट्टीखदान, नागपूर येथे दाखल मिसींग क्र. ६३/२०२४ मधील दोन्ही मिसींग मुलींचा शोध घेत असतांना मिसींग दुसरी मिसिंग मुलगी ही आरोपीसह पो.ठाणे काटोल, नागपूर ग्रामीण येथे मिळुन आल्याने नमुद मिसींग मुलगी हिला ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणून विश्वासात घेवून विचारपुस केली असता तिने बयान दिले की, यातील फिर्यादी मिसींग मुलगी व फिर्यादीची मैत्रिण म्हणजे (पहिली मिसींग मुलगी) हिला राहूल मालवीया नावाच्या व्यक्तीने जास्त पगाराची नोकरी लावून देतो असे आमिष देवून फुस लावून, त्याची पत्नी नेहा मालवीया हिच्या मदतीने राजस्थान येथील जबलपूर (आमजदकला) गावाला नेवून राणी रमेश लोधा हिच्या मदतीने तेथील लोकांकडून पैसे घेवून हिला तिच्या इच्छेविरूध्द लग्नसाठी विक्री केली आहे. तसेच फिर्यादी मुली सोबत राजस्थान येथुन काटोल, नागपूर येथे आलेली पो.ठाणेला दाखल मिसींग क्र. ६४/२०२४ मुलगी हिला सुध्दा फुस लावून तिच्या ईच्छेविरूध्द राहूल मालवीया, नेहा मालवीया व राणी लोधा यांनी लोकांकडून पैसे घेवून लग्नासाठी विक्री केले अशा फिर्यादी (मिसींग मुलगी दुसरी) हिने दिलेल्या रिपोर्ट वरून आरोपीतांविरूध्द पो. ठाण्यात अप.क्र. ३९०/२०२४ कलम ३६६, ५०६, ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व मिसींग मुलगी दुसरी हिच्या सोबत असलेली नमुद गुन्हयातील आरोपी महीला हिला देखील पो. ठाणे काटोल, नागपूर ग्रामीन येथुन ताब्यात घेवून नमुद गुन्हयात कायदेशीर अटक करण्यात आली व नमुद गुन्हयाच्या पुढील तपासकामी तसेच गुन्हयातील फरार आरोपीचा शोध घेवून अटक करणे कामी अटक आरोपी महीलेचा पिसीआर घेण्यात आला. तसेच (मिसींग पहिली मुलगी) हिचा तांत्रीक मदतीच्या आधारे बकानी, जि.झालावाड, राजस्थान येथे जावून शोध घेतला असता (मिसींग पहिली मुलगी) ही तिथे मिळुन आली असता तिला सुखरूप ताब्यात घेवून पोस्टेला आणून तिच्या पालकाच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले अशा प्रकारे सदरचा गुन्हा मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे, अपर पोलिस आयुक्त प्रमोदकुमार शेवाळे, पोलिस उपायुक्त राहुल मदने, परि.क्र.०२, नागपुर शहर सहायक पोलीस आयुक्त माधुरी बावीस्कर, सदर विभाग, नागपूर शहर, यांचे मार्गदर्शनात वरीष्ठ पोलिस निरीक्षक विनोद कालेकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र बोबडे, सहा.पोलिस निरिक्षक चेतन बोरखडे, पोलिस उपनिरिक्षक राजेश पुरी, पोलिस उपनिरिक्षक गोपाल राऊत, पोलिस उपनिरिक्षक महादेव नाईकवाडे, पोहवा सचिन, पोहवा दिनेश, नापोशि विशाल, पोशि अमितकुमार, पोशि आकाश पो.ठाणे गिट्टीखदान, नागपूर शहर यांनी केलेली असून पुढील तपास सुरू आहे.