
अट्टल घरफोड्या स्थागुशा पथकाचे ताब्यात,गुन्हे केले उघड….
घरफोडी करणाऱ्या चोरट्यांस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…
गोंदिया(प्रतिनिधी) – .याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, तक्रारदार मोहम्मद शाकीर अब्दुल गनी कुरैशी, व्यवसाय- मोटार सायकल मेकॅनीक, रा. बाजपेयी वार्ड, मदीना मस्जिद चे जवळ, गोंदिया यांचे वाजपेयी चौक येथील भाई एच.के.जी.एन ऑटोपार्ट अॅन्ड रिपेअर्स नावाचे दुकानाचे जिन्याचे चॅनल गेटला लावलेले कुलुप तोडुन दुकानातील कांउटर चे लॉकर तोडुन लॉकर मध्ये ठेवलेले रोख रक्कम- 30,000/-रु कोणीतरी अज्ञात चोरट्यानी दिनांक- 26/2/24 ते 27/2/24 चे रात्रीदरम्यान दुकानातून चोरुन नेल्याचे फिर्यादीचे तक्रारीवरुन पो.स्टे.गोंदिया शहर येथे अप. क्रं. 102 /2024 कलम 454, 457, 380 भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता…


सदर गुन्ह्याचे अनुषंगाने वरिष्ठांचे प्राप्त निर्देश सूचनाप्रमाणे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात स्था.गु.शा. येथील पथकातील पोलिस अधिकारी,अंमलदार यांनी गुप्त माहितीच्या आधारे सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेवून एफ.सी.आय.गोडावून परिसर मूर्री येथून घरफोडी करणारा आरोपी
1) राहुल ऊर्फ चोचो गेंदलाल ओमकारकर वय 24 वर्षे रा. नंगपुर्रा मुररी ता.जि. गोंदीया

यास गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेवून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचा मित्र सुरज ऊर्फ मित्तल मुनेश्वर तुपटे रा. पैकनटोली गोंदिया याचेसह मिळुन दिनांक 26/2/24 ते 27/2/24 चे रात्री दरम्यान वाजपेयी चौक येथील दुकानातून घरफोडी केल्याचे कबूल केले आरोपीचे ताब्यातून गुन्हयात चोरीस गेलेल्या रोख रक्कमेपैकी 100/- व 200/- रूपये दराच्या नोटा एकूण- 5200/- रू. हस्तगत करून जप्त कऱण्यात आले आहे ताब्यात घेतलेल्या आरोपीस पुढील कारवाईकरीता गोंदिया शहर पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे पुढील तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहेत

सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा दिनेश लांडे,व पथकातील पो. उप.नि. महेश विघ्ने, स. फौ. कावळे, पो.हवा. देशमुख, मेहर, कोडापे गायधने, हलमारे, रियाज शेख, पो.शि. संतोष केदार, म.पो.शि. येरणे यांनी केली आहे.


