
गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा…,
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा,8 जुगारींसह 1 लाख 23 हजार 425/- रू चा मुद्देमाल घेतला ताब्यात……
गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यांतील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस तसेच सर्व प्रभारींना दिले होते त्या अनुषंगाने


वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचना प्रमाणे व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे जिल्ह्यातील अवैध धंदया विरूद्ध प्रभावी धाड मोहीम राबवून कारवाई करण्यात येत आहे त्यानुसार दिनांक-03 मार्च 2024 रोजी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे स्था.गु. शा. पथकाने रात्री 08.00 ते 09.00 वा.च्या सुमारास पोलिस ठाणे गोंदिया ग्रामीण हद्दीतील मौजा नावटोला, नागरा शेतशिवार परिसरात सापळा रचून धाड कारवाई केली असता 52 तासपत्यावर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळ खेळणाऱ्या 08 इसमांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले तासपत्त्यावर जुगार खेळ खेळणाऱ्या इसमांच्या ताब्यातून अंगझडतीत आणि फळावरील रोख रक्कम 22,500/-, एकूण 6 नग महागडे मोबाईल किं 1 लाख/-रु. तसेच जुगार खेळण्याकरिता वापरावयाचे तासपत्तीचे 15 कॅट किमती 825 /- रु, एक गमछा किमती 100/- असा *एकुण 1 लाख 23 हजार 425/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे

नमुद ठिकाणी खालील ईसम हे जुगार खेळतांना आढळुन आले

1) स्वप्नील रमेश झाडे, वय 27 वर्षे, रा. दुर्गा मंदीर जवळ, अंगुरी बगीचा कटंगी, गोंदिया
2) कुणाल उमेश राणे, वय 24 वर्षे,रा. कुडवा, गोंदिया
3) अलताफ शहीद राईन, वय 25 वर्षे, रा. रामनगर, गोंदिया
4) राजेंद्र सेवकराम लिल्हारे, वय 35 वर्षे, रा. टेमनी, गोंदिया
5) अमजद मंजुर तिघाला, वय 40 वर्षे, रा. अन्सारी बार्ड, गोंदिया
6) विवेक प्रकाश कांबळे, वय 30 वर्षे, रा. भिमनगर, गोंदिया
7) प्रदिप लक्ष्मीनारायण शेंडे, वय 32 वर्षे, रा. कन्हारटोली, जे.एम. स्कूल जवळ, गोंदिया
८) जितेंद्र धन्नालाल डहारे, वय 40 वर्षे, रा. कुडवा,
यांचेविरुध्द पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण येथे कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा यांचे आदेशाने पोलिस निरींक्षक दिनेश लबडे, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात सदरची धाड कारवाई पो.उप.नि. महेश विघ्ने, पो.हवा. सोमू तुरकर,रियाज शेख,प्रकाश गायधने, पो.शि. संतोष केदार, चा.पो.हवा. लक्ष्मण बंजार, स्था.गु. शा. गोंदिया यांनी केलेली आहे


