देवरी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथकाची अवैध धंद्यावर धडक कारवाई,४० लक्ष रु चा गुटखा जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गोंदिया पोलिस अधिक्षक  निखिल पिंगळे, अपर पोलिस अधिक्षक  कॅम्प देवरी  नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये उपविभाग देवरी अंतर्गत पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरीता उपविभागीय पोलिस अधिकारी  संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले असुन पथकाद्वारे जिल्ह्यातील देवरी उपविभागातील अवैध धंद्यांवर धाड कारवाई करण्यात येत आहे…..

नवेगावबांध(गोंदिया) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक निखील पिॅगळे यांचे आदेशानुसार व उपविभागिय पोलिस अधिकारी,देवरी संकेत देवळाकरिता यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक – 28/12/2023 रोजी पोलिस स्टेशन  नवेगावबांध परिसरात पेट्रोलिंग दरम्यान छापा कारवाई केली असतांना धाबेपवनी चौकात एक आयचर ट्रक संशयीतरित्या दिसून आल्याने त्यास पोलिस पथकाने थांबवुन आयचर ट्रक चालक नामे – ओमप्रकाश देवाजी शिंदे यास ट्रकमध्ये असलेल्या मालाबाबत विचारपूस शहानिशा केली असता त्यांनी उडवा-उडविचे उत्तर दिल्याने सदरचा आयसर ट्रक पोलिस स्टेशन नवेगावबांध येथे आणुन पाहणी केली असता ट्रक मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला पान मसाला/सुगंधित तंबाखु  गुटखा असा मुद्देमाल अवैधरित्या वाहतूक करतांना मिळुन आल्याने सदर संबंधात तात्काळ अन्न व औषध प्रशासनास माहिती देवुन अन्न-औषध सुरक्षा अधिकारी यांना पाचारण करुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला पान मसाला/सुगंधित तंबाखु  गुटखा ट्रकसह असा  एकुण 40 लाख 20 हजार 120/- रुपयांचा* मुद्देमाल जप्त करण्यात आला







ट्रक चालक नामे- ओमप्रकाश देवाजी शिंदे वय 35 वर्षे रा. काटोल रोड पेटरी ता.जि. नागपुर  याचेविरुध अन्नसुरक्षा व मानदे कायदा, आणि भादंवि कायद्यान्वये पोलिस स्टेशन नवेगावबांध येथे अप.क्र.112/2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे



सदरची द कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांचे नियंत्रणात व मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील अधिकारी – अंमलदार तसेच अन्न सुरक्षा प्रशासन अधिकारी कर्मचारी यांनी केलेली आहे….







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!