
संशयीतांना ताब्यात घेऊन रामनगर पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा…
रामनगर पोलिसांनी संशयीतास ताब्यात घेऊन उघड केला घरफोडीचा गुन्हा,मुद्देमाल हस्तगत…
गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबात सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी रवींद्र पांडुरंग सुरसाउत- वय 40 वर्ष रा. रंजीत प्रेस जवळ कन्हारटोली, गोंदिया, हे परिवारासह बाहेरगावी गेले असता दि(26)जुलै 2024 चे रात्री 10.00 ते 27 जुलै चे रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यानी त्यांचे राहते घराचे समोरील दाराचे कुलुप कोंडा तोडून बेडरूम मधील गोदरेज आलमारीतील लॉकर तोडून त्यामधे ठेवलेले सोन्याचे दागिने किं54,000/- रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याने फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन पोलिस ठाणे रामनगर येथे अपराध क्रमांक 207/024 कलम 331(4), 305(A) भा. न्याय संहिता -2023 अन्वये दाखल करण्यात आले होता


पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांचे आदेशाने सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येत होता त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन रामनगर येथील डी. बी. पथक अज्ञात आरोपी व गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालाचे शोधात होते रामनगर पोलिस पथक अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना पथकाने गुप्त बातमीदाराचे खात्रीशीर बातमीच्या आधारे गुन्ह्यात चोरी संबंधाने यातील संशयित आरोपी 1) रितिक उर्फ दद्दू प्रदीप वासनिक वय 22 वर्ष राहणार मलपुरी टेकरी तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया यास ताब्यात घेऊन गुन्ह्यात चोरी गेलेले सोन्याचे दागिने संबंधाने विचारपूस केली असता आरोपी यांने सदरचा गुन्हा त्याचा इतर सहकारी हर्ष उर्फ एक्का महेंद्र रामटेके वय 23 वर्ष राहणार खैरलांजी रोड रेल्वे चौकी जवळ, गौतम बुद्ध, वॉर्ड तिरोडा याचे सोबत मिळून केल्याचे सांगितले अशी कबुली दिली

आरोपीची माहिती काढून त्यास नमूद गुन्ह्यात अटक करून विचारपूस दरम्यान त्याचे कडून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी यांचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेले दागिणे सोन्याची अंगुठी, नथ, मंगळसूत्राचे सोन्याचे पदक, एक जोडी बिरी, 8 नग गहूम़णी असा एकूण किंमती 45000/- रुपयांचा मुददेमाल हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आला आहे व यातील आरोपी 1) रितिक उर्फ दद्दू प्रदीप वासनिक वय 22 वर्ष राहणार- मलपुरी टेकरी, तालुका- तिरोडा जिल्हा- गोंदिया 2) हर्ष उर्फ एक्का महेंद्र रामटेके वय 23 वर्ष राहणार खैरलांजी रोड रेल्वे चौकी जवळ गौतम बुद्ध वॉर्ड, तिरोडा
यांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा,उपविभागीय पोलिस अधिकारी,गोंदिया रोहिणी बानकर,पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांचे मार्गदर्शनात पोहवा. सुनीलसिंह चौव्हाण, छत्रपाल फुलबांधे, राजेश भगत, कपिल नागपुरे, उमेश भानारकर, चालक संदीप घरोटे यांनी केली आहे.


