
दागिणे चोरणार्या टोळीस गोंदीया गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन,२० लाखाचा मुद्देमाल केला जप्त….
गोंदीया बसस्थानकात बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधील दागिने चोरणाऱ्या महिलेसह एका विधी संघर्षीत बालिकेस व ईतर दोघांना अश्या चौघांना स्था.गु.शा. पथकाने ताब्यात घेऊन उघड केले अनेक चोरीचे गुन्हे,त्यांचे ताब्यातुन एकूण 20 लाख 09 हजार 400/- रु चा मुद्देमाल केला जप्त….
गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (18) चे दुपारी 4.25 ते 4.45 वा चे दरम्यान तक्रारदार महीला सौ.अरुणा गौरव येडे रा. कलपाथरी पो. पाथरगाव ता.लांजी जिल्हा बालाघाट ही मरारटोली बस स्टॉप वर तिचे मुलासह गोंदिया ते भंडारा जाणार्या एसटी बस मध्ये चढत असताना तिचे पर्स मध्ये असलेले सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची चैन, एक सोन्याची अंगठी, सोन्याचे कानातील झुमके, चांदीचे पैजन व नगदी 25,000/- रू असा एकुण 2 लाख 43 हजार रु.चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यानी चोरून नेला असे फिर्यादीचे तक्रारी वरून पोलिस ठाणे रामनगर येथे अपराध क्र. 133/ 2024 कलम 379 भादवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता


सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिनेश लबडे,यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळास भेट देवून गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना घटनास्थळ परीसराची सी. सी. टी.व्ही. फुटेज द्वारे पाहणी करीत असता, प्राप्त फूटेज मध्ये फिर्यादी च्या आसपास दोन संशयास्पद महिला फिर्यादीच्या मागावर असल्याचे तसेच महिला फिर्यादी ज्या बसमध्ये चढत होत्या त्यांच्यासोबत राहून गर्दीचा फायदा घेवून संशयास्पदरित्या फिर्यादी जवळून पळून जातांना दिसून आल्या सदर महिलांच्या बाबत गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती प्राप्त करून मिळालेल्या माहितीच्या आधारे दि (21) रोजी यातील संशयित महिला 1) सिमरण आशिष बिसेन, वय 24 वर्ष रा. शिवाजी वार्ड, कुडवा, गोंदिया 2)विधीसंघर्षीत बालिका वय 15 वर्ष यांना गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेण्यात आले दोघींनाही बसस्थानक परिसरातील चोरीच्या घटनेबाबत विश्वासात घेवून विचारपूस चौकशी केली असता महीला आरोपी व विधी संघर्षीत बालिका या दोघींनी ही नमूद चोरी केल्याचे कबूल केले त्यांचेकडून पो.स्टे. रामनगर गुन्ह्यातील दागिने एकूण किमती 2 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे

त्याचप्रमाणे सदर महिला आरोपी सिमरन व विधीसंघर्षीत बालीका यांना चोरी संबंधात सखोल विचारपुस चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील मुद्देमाला व्यतिरिक्त आणखी चोरीचे ईतर गुन्हे केल्याचे सांगितल्याने त्यांचे ताब्यातून त्यांचे राहते घरझडतीमध्ये एकुण किंमती 17 लाख 81 हजार 400/- रु चा मुद्देमाल (पिवळसर व चांदी सारखे धातूचे दागिने मिळुन आल्याने हस्तगत करण्यात आले.सदरच्या मुद्देमाला बाबत त्यांना सखोल विचारणा केली असता, त्यांनी काही मुद्देमाल एक महिन्यापूर्वी सालेकसा बस स्टॅन्ड परीसरातून एका महिलेच्या पर्स मधून चोरल्याचे तसेच उर्वरीत मुद्देमाल हा आरोपी 1) सुरज पप्पु बिसेन, वय 20 वर्षे,2) आशिष पप्पु बिसेन, वय 28 वर्षे, दोन्ही रा. शिवाजी वार्ड, कुडवा,गोंदिया यांनी गोंदिया, रामनगर परीसरातून चोरी केल्याचे सांगितले असा एकुण 20 लाख 09 हजार 400/- रु. चा संपुर्ण मुद्देमाल गुन्ह्यात हस्तगत करून जप्त करण्यात आलेला आहे

यातील महिला आरोपी 1) सिमरण बिसेन,व 2)विधि संघर्षीत बालीका या दोघींनी 1) पोलिस स्टेशन रामनगर अप.क्र. 133/24 कलम 379 भादवि, तसेच 2) पो. स्टे सालेकसा अंतर्गत बसस्टॅन्ड वरील चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.तसेच यातील
आरोपी 3)सुरज पप्पु बिसेन, वय 20 वर्षे,4) आशिष पप्पु बिसेन, वय 28 वर्षे, दोन्ही रा. शिवाजी वार्ड, कुडवा, गोंदिया यांनी गोंदिया, रामनगर परीसरातून चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून जिल्ह्यातील चोऱ्यांच्या उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांनाही गुन्ह्याच्या पुढील तपास कायदेशीर प्रक्रिया कारवाई संबंधाने रामनगर पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे .यातील महीला आरोपी व विधी संघर्षीत बालिका, आणि पुरुष आरोपींनी मिळुन जिल्ह्यात ईतर आणखी चोऱ्या केल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत सखोल तपास रामनगर पोलिस करीत आहेत
सदरची उत्कृष्ट कामगिरी पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, पोलिस स्टेशन रामनगर चे पोलिस निरीक्षक संदेश केंजले यांचे नेतृत्वात पथकातील पोउपनि महेश विघ्ने, मपोउपनि वनिता सायकर,पोहवा दुर्गेश तिवारी, इंद्रजित बिसेन, प्रकाश गायधने, सुजित हलमारे, पोशि संतोष केदार, चापोशि कुंभलवार यांनी केलेली आहे.तसेच पोलिस ठाणे रामनगर चे पोलिस अंमलदार यांनी केली


