गावठी कट्टा बाळगणारे गोंदिया LCB चे ताब्यात…
अग्नीशस्त्र पिस्टल (गावठी कट्टा) बाळगल्याप्रकरणी दोघांना स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक, निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यांत अवैध कृती करणारे, जनसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसावा याकरिता अवैधरित्या शस्त्र बाळगणारे गुन्हेगार, अवैध धंदे करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत
या अनुषंगाने पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांच्या मार्गदर्शनात स्था. गु. शा. पोलिस पथकाने गोंदिया शहरात पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय बातमीदाराकडून प्राप्त माहितीच्या आधारे अवैधरित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी ईसंम नामे 1) सुमित महानंदे, रा. सावराटोली, गोंदिया यांचे राहते घराची झडती घेवून शहानिशा केली असता- त्याचे राहते घरी बेडरुम मधील लाकडी दिवानमध्ये एक लोखंडी पिस्टल मॅगझिनसह. किंमती 25,000/-रु चे अग्निशस्त्र (गावठी कट्टा) मिळुन आल्याने जप्त करण्यात आला असुन ह शस्त्र सुमीत महानंदे यांचे असुन ते त्यानी त्याचा भाऊ भुपेंद्र महानंदे याचेकडे ठेवायला दिले होते
1) सुमित विनोद महानंदे, वय 32 वर्षे रा. सावराटोली, बजाज बार्ड, गोंदिया हा फरार असुन त्याचा भाऊ 2)भुपेंद्र विनोद महानंदे, वय 28 वर्षे, रा. सावराटोली, बजाज बार्ड, गोंदिया हा पोलिसांचे ताब्यात आहे यांचे विरुद्ध पो. ठाणे गोंदिया शहर येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25, सह कलम 135 म. पो. का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास गोंदिया शहर करीत आहे
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा यांचे आदेशानुसार पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. महेश विघ्ने, मपोउपनि वनिता सायकर, पोहवा. राजु मिश्रा, महेश मेहर, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांनी केली आहे…