अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…
रेतीची चोरी करुन अवैधरित्या वाहतुक करणारे 4 इसमांविरुद्ध. पोलिस ठाणे दवनीवाडा व तिरोडा येथे गुन्हे नोंद करुन 3 ट्रॅक्टर- ट्रॉली, 3 ब्रास रेती असा किंमती एकूण 14 लाख 9 हजार रु चा मुद्देमाल केला जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी….
गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक,निखिल पिंगळे, यांनी आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी यांना त्यांचे पोलिस ठाणे हद्दीत चालणारे अवैध धंदे दारू, मटका, जुगार, अवैध गौण खनिज रेती चोरी,यासारखे व ईतर अवैध धंदे, यांचेवर प्रभावी धाडी घालून जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले आहेत आणि यानिमित्ताने संपुर्ण जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाविरूद्ध सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंदयावर, छापे टाकून कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे
या अनुषंगाने वरीष्यांठाचे निर्देशाप्रमाणे, पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात दिनांक.27 व 28 रोजी अवैधरित्या रेतीची चोरी प्रकरणी पो. ठाणे दवनिवाडा हद्दितील मौजा – टंकीटोली, अर्जुनी येथे व तिरोडा परीसरातील नवेझरी येथे धाड कारवाई केली असता अवैधरीत्या गौण खनिज रेतीची चोरी करून वाहतूक करतांना 4 इसम हे त्यांचे ताब्यातील 3 ट्रॅक्टर ट्रॉलीसह ज्यात अंदाजे 3 ब्रास रेती जप्त करण्यात आली.
सदर प्रकरणी पोलिस ठाणे दवनीवाडा येथे ट्रॅक्टर चालकःमालक नामे1)ओमप्रकाश रामचंद्र देशमुख वय 35 वर्ष 2) सुजान अर्जुन कुसवाहा वय 28 वर्ष 3) राजेश पतीराम बावणकर वय 50 वर्ष, तिन्ही रा. अर्जुनी, ता तिरोडा, जि. गोंदिया यांचेविरुद्ध तसेच पोलिस ठाणे तिरोडा येथे आरोपी नामे4) प्रमोद गोपीचंद ठवकर वय 44 वर्षे रा. मुंढरी याचे विरुद्ध कलम 379, 109 भादवी अन्वये वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.नमूद आरोपी याचे ताब्यातून- गौण खनिज (रेती) चोरी करीता वापरलेले 3 ट्रॅक्टर ट्रॉलीसह ज्यात अंदाजे 3 ब्रास रेती असा एकूण किंमती 14 लाख 9 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक,. निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, नित्यानंद झा, यांचे आदेशानुसार पो. नि. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शना पोलिस अंमलदार स.फौ. कृपान, पो.हवा. लुटे, तुरकर, बिसेन चा.पो.हवा- बंजार यांनी केली आहे.