
बनावट दारु निर्मीती कारखाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,निर्मीती साहीत्यासह ५ लाखाचेवर मुद्देमाल जप्त….
अवैधरित्या बनावट इंग्रजी दारू निर्मिती कारखाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,निर्मीती साहीत्य व तीन आरोपींसह ५ लाखाचे वर मुद्देमाल केला हस्तगत…..
गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 29 एप्रिल 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस ठाणे गोंदिया शहर, रामनगर परिसराध्ये अवैध धंदे, चोरी/ घरफोडीचे गुन्हेगार शोध, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पथकास गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की भागवतटोला शेतशिवारामध्ये धर्मेंद्र डहारे रा ढाकनी नावाचा ईसम हा आपल्या ईतर साथीदारांचे मदतीने एका पक्क्या बांधकाम असलेल्या घरात/ गोठ्यात बनावट इंग्रजी दारू निर्मिती करत आहे


अशा मिळालेल्या खात्रीशीर खबरेबाबत पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांना माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन रात्री 12.30 वाजता छापा टाकून कारवाई केली असता पोलिस आल्याची चाहूल लागताच काही इसम रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पळून गेले तर तिघे इसम बनावट इंग्रजी दारू निर्मिती करीत असताना घटनास्थळी मिळून आले.मिळून आलेल्या तिन्ही इसमांना ताब्यात घेऊन बनावट इंग्रजी दारू निर्मिती ठिकाणची पाहणी करून बनावट इंग्रजी दारू निर्मिती करीता वापरते साहित्य स्पिरीट, खाली बॉटल, डुप्लिकेट लेबल, विविध रंगाचे चॉकलेटी फ्लेवर, 4 मोटर सायकल, प्लास्टिक कॅन, ड्रम, बनावटी इंग्रजी दारू, टिल्लू पंप, व दारू निर्मिती चे ईतर साहित्य असा एकुण कि 5 लक्ष 88 हजार 260/- रु चा मुद्देमाल व आरोपीं 1) हंसराज सुखचंद मस्करे वय 49 वर्षे रा ढाकणी 2) जितेंद्र गोधनलाल नागपुरे वय 36 वर्षे रा- ढाकणी 3) गुलाब किसन वाढवे वय 40 वर्ष रा ओझीटोला यांचे ताब्यातुन जप्त करण्यात आला सविस्तर जप्तीची प्रक्रिया पंचनामा कारवाई करण्यात आली असुन फरार पाहिजे आरोपी* क्र. 4) धर्मेंद्र डहारे रा ढाकणी व इतर यांचेविरुद्ध पोलिस ठाणे रामनगर येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65 अ, ब ,क ,ड, ई , 83, 108 सह कलम 123 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया रामनगर पोलिस करीत आहेत

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा,यांचे निर्देशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी गोंदिया रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे नेतृत्वात सपोनि धीरज राजूरकर, पोउपनि शरद सैदाने, पोहवा राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, भुवन देशमुख, सुजित हलमारे प्रकाश गायधने , इंद्रजीत बिसेन, सुबोध बीसेन, दुर्गेश तिवारी, घनश्याम कुंभलवार, राम खंदारे लक्ष्मण बंजार यांनी केली आहे…



