गर्भवती करुन १८ वर्षीय महीलेचा गळा दाबुन खुन करुन जाळणार्याच्या गोंदिया पोलिसांनी काही तासात आवळल्या मुसक्या….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पोलिस ठाणे गोरेगाव अंतर्गत मौजा- म्हसगाव देवुटोला शेत शिवारात अनोळखी मुलगी / महीला अंदाजे 20 ते 25 वर्षे हिचा अज्ञात कारणावरून जाळून निर्घृण खुन करणार्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासाचे आत केले जेरबंद करून केला खुनाचा उलगडा….

गोंदिया(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गोरेगाव पोलिस स्टेशन हद्दीतील म्हसगाव येथील पोलीस पाटिल यांनी पोलिस स्टेशन गोरेगाव येथे तक्रार दिली की दि 10 फेब्रुवारी रोजी चे सकाळी अंदाजे 08.00 वाजता चे पूर्वी एका अनोळखी मृतक मुलगी/ महीला- वय अंदाजे 20 ते 25 वर्षे वयोगट हिला कोणीतरी अज्ञात ईसमाने जाळून खून केल्याचे तक्रारीवरुन पोलिस ठाणे गोरेगाव येथे अपराध क्रमांक- 49/2025 कलम 103,(1), 238 भा.न्या.सं. 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता





सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी, आमगाव  प्रमोद मडामे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांना तसेच पोलिस ठाणे गोरेगाव चे पोलिस निरीक्षक  अजय भुसारी, यांना निर्देश  देवुन सदर खुनाचा गंभीर गुन्हा करणाऱ्या अज्ञात आरोपीचा तसेच अनोळखी मृतक मुलीची ओळख पटवून तात्काळ शोध घेवून खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीस जेरबंद कऱण्याचे निर्देश दिलेले होते



त्या अनुषंगाने वरिष्ठांचे निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे, तसेच पोलिस ठाणे गोरेगाव येथील वेग वेगळी पोलिस पथके आरोपीचे शोधार्थ नेमण्यात आलेली होती.नेमण्यात आलेल्या पोलिस पथकाने अतिशय संयमाने, बुध्दीकौशल्य, अथक परिश्रमाने खुनाच्या गुन्ह्याचे अनुषंगाने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावरून प्राप्त भौतिक व परिस्थितीजण्य पुरावे, तसेच म्हसगाव गावातील व परिसरातील लोकांना विचारपूस, संशयितांची पडताळणी, तांत्रीक विश्लेषण, आणि प्राप्त सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज यावरून मृतक मुलगी  पौर्णिमा विनोद नागवंशी वय अंदाजे 18 वर्षे रा मानेकसा ( कालिमाटी ) पो. ठाणे आमगाव येथील असल्याबाबत ओळख पटवण्यात आली तसेच तिचे नातेवाईक आई- वडील यांना सखोल विचारपूस चौकशी करून अत्यंत कुशलतेने मृतक मुलीच्या ओळखीचा व खून करणारा पूर्वाश्रमीचा विट भट्टी मालक आरोपी  शकील मुस्तफा सिद्दीकी वय 38 रा. मामा चौक, गोविंदपुर रोड, गोंदिया ता. जिल्हा गोंदिया यास खुनाच्या गुन्ह्यात निष्पन्न करुन  दुपारी ताब्यात घेण्यात आले आरोपी यास खुनाच्या गंभीर गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपूस चौकशी केली असता आरोपीने मृतक मुलीचा गळा आवळून जाळून खून केल्याचे कबूल केले मृतक मुलीला कोणत्या कारणावरून जिवे मारून जाळून तिचा निर्घृण खून केला याबाबात विचारणा केली असता प्रथमदृष्ट्या आरोपी याने सांगीतले की मृतक मुलगी त्याचेपासून गरोदर असल्याचे व मुलगी आरोपी सोबतच राहण्यास इच्छुक असल्याने मुलीपासून आपली सुटका करून घेण्याकरिता तीला जिवे मारण्याचे ठरविले होते आणि त्यावरून मृतक मुलीला घटनास्थळ ठिकाण- मौजा देवुटोला (म्हसगाव) शेत शिवारात घेऊन जावून तिचा दुपट्टयाने गळा आवळून तिच्या अंगावर चादर व तनस टाकून जाळून पुरावा नष्ट करण्याचे उद्देश्याने तिचा खून केल्याचे सांगीतले यावरुव आरोपी यास गोरेगाव पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले असून गुन्ह्यात अटक करुन पुढील तपास गोरेगाव पोलिस करीत आहेत



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी, आमगाव  प्रमोद मडामे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, सपोनि. धीरज राजूरकर, मपोउपनि वनिता सायकर, स्थानिक गुन्हे शाखेतील पोहवा राजू मिश्रा, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, विठ्ठल ठाकरे, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, रियाज शेख, इंद्रजीत बिसेन, प्रकाश गायधने दुर्गेश तिवारी, सुबोध बिसेन, अजय रहांगडाले हंसराज भांडारकर, संतोष केदार, मपोशी स्मिता तोंडरे, पोशी दुर्गेश पाटील चापोशी कुंभलवार, राम खंडारे, तसेच पोलिस ठाणे गोरेगाव- येथील पोलिस निरीक्षक अजय भुसारी, आणि पोलीस ठाणे गोरेगाव  तसेच तांत्रिक सेलचे- पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात सपोनी ओमप्रकाश गेडाम, रोशन येरणे, योगेश रहिले यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!