कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे नवेगांवबांध पोलिसाचे ताब्यात,४९ गोवंश यांना दिले जिवनदान…
नवेगावबांध पोलिसांनी नाकाबंदी करुन कत्तलीकरीता जाणाऱ्या ४९ लहान-मोठे गोवंशीय जनावरांना केले मुक्त,४ आरोपींसह १९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….
नवेगावबांध(गोंदिया)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२८)सप्टेंबर २०२४ पोलिस स्टेशन नवेगाबांध येथील पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनीय माहीती मिळाली की एका ट्रकमधे गोवंशीय जनावरांची वाहतुक होणार आहे अशा खात्रीशीर गुप्त बातमीदारांनो दिलेल्या माहीतीनुसार पोलिस निरीक्षक योगिता चाफले ठाणेदार पोस्टे नवेगावबांध यांचे मार्गदर्शनाखाली दोन पथक तयार करुन एक पथक हे धाबेपवनी येथे तैनात करण्यात आले.
धाबेपवनी त नवेगावबांधकडे येणा-या डांबरी रोडने दिनांक २८/०९/२०२४ चे रात्री ११.१० दरम्यान एक कथ्या रंगाचा टाटा कंपनीचा दस चक्का ट्रकमध्ये अवैध्य जनावरांची वाहतुक होत असल्याचे लक्षात येताच धाबेपवनी येथील पथकाने त्याचा पाठलाग केला असता सदर ट्रक हा नवेगांवबांध मार्गाने जांतांना दिसताच नवेगांवबांध येथील दुसऱ्या पथकाला माहाती देवुन नवेगांवबांध येथील कृषी बाजार समीती समोर नाकांबदी लावुन येणाऱा वाहनाची तपासणी केली असता वाहन क्रमांक एम एच ४० वाय ०६९६ या वाहनास थांबुन त्याची पाहणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या ४९ लहान-मोठे गोवंशीय जनावरांना कोंबुन, त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था न करता दोराने घट्ट बांधुन व कोणतेही वैद्यकीय परीक्षण न करता निर्दयतेने कत्तलीकरीता कत्तलखाण्यात घेवुन जातांना मिळुण आले
सदर प्रकरणी यातील आरोपी १) नईमोद्दीन नजीरोहीन वय ३७ वर्ष, २) सलमानखान आशिफ खान वय २६ वर्षे, ३) अब्बदुल राजीक अब्दुल खालीक वय ३० वर्षे, तिन्ही रा. पठाणपुरा जुनी बस्ती मुर्तीजापुर ता. मुर्तीजापुर जि. अकोला, ४) वैभव राजकुमार भैसारे, वय २२ वर्षे, रा. मिसपिरी ता.देवरी जि. गोंदिया यांचे विरुद्ध पोलिस स्टेशन नवेगावबांध येथे अप क्रमांक १३२/२०२४ कलम ५ (अ), ९ (ब), म.प.सं. कायदा-१९७६ सहकलम ११(१) (ड) (ई) (फ) प्रा.नि.वा.प्र.का. १९६० प्रमाणे नोंद केला असुन एक टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच ४० वाय ०६९६ किंमती-१५,००,०००/- (पंधरा लक्ष रु) व ४९ गोवंशीय जनावरे किंमती ४,९०,०००/- असा एकुण १९,९०,०००/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक गोरख भामरे,अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधीकारी देवरी विवेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन नवेगावबांध येथील ठाणेदार पोलिस निरीक्षक योगीता चाफले, पोउपनि. दुनेदार, पोहवा. कैलास जुमनाके, इंदुरकर,नापोशि कोरे, मेन्ढे, पोशि जमदाळ,निकुरे, चापोहवा. शेख, पोहवा, राउत पोस्टे नवेगावबांध यांनी केली असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक योगीता चाफले याचे मार्गदर्शनाखाली पोहवा. इंदुरकर पोलीस स्टेशन नवेगांवबांध हे करीत आहेत