गोंदीया LCB पथकाने २८ किलो गांजासह एकास घेतले ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंमली पदार्थ गांजा सह एकास ताब्यात घेऊन 28 किलो 120 ग्रॅम एकूण 8 लक्ष 68 हजार 630/- रुपयांचा मुद्देमाल जप्त….





गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि-(17) ॲाक्टोबर 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक हे पोलिस स्टेशन रामनगर हद्दीत अवैध धंदे, गुन्हेगार शोध, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना सायंकाळी अंदाजे 05.00 वा चे सुमारास पोलिस ठाणे – रामनगर हद्दीतील रेलटोली मालधक्का परिसरात रेल्वे स्टेशन कडून हनुमान मंदीर कडे जातांना एक ईसंम ट्रॉली बॅगसह संशयास्पद स्थितीत दिसून आल्याने त्यास थांबवून त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव  सतीश दीनानाथ उपाध्याय वय 25 वर्षे राहणार- तीलवारा घाट, ता. गोरखपुर , जिल्हा – जबलपूर ( म. प्र. ) असे सांगीतले



त्याचेवर संशय बळावल्याने त्यास  ताब्यात घेऊन त्याच्या दोन ट्रॉली बॅग, व एक स्ल्याक बॅगेत काय आहे याबाबत विचारपुस केली असता  सुरवातीस उडवा उडविचे उत्तरे देत असल्याने त्याचे ताब्यातील दोन्ही ट्रॉली व स्ल्याक बॅग ची पाहणी केली असता दोन ट्रॉली बॅग, व स्ल्याक बॅग मध्ये प्लास्टिक चे चिकट टेप पट्टी ने वेस्टन केले असलेले एकूण 14 नग पॉकिटे दिसून आले



त्यापैकी एक वेस्टन असलेले पाकिट् उघडले असता त्यात पाने, फुले, फळे आणि बिया मिश्रित हिरव्या रंगाचा वनस्पती ओलसर गांजा दिसून आल्याने जप्तीची सविस्तर प्रक्रिया करुन  आरोपी  सतीश दीनानाथ उपाध्याय वय 25 वर्षे याचे ताब्यातून 28 किलो 120 ग्रॅम गांजा, दोन ट्रॉली बॅग, एक स्ल्याग बॅग असा किंमती एकूण 8,68, 630/- रु गांजा जप्त करण्यात आलेला असुन 1) सतीश दीनानाथ उपाध्याय वय 25 वर्षे 2) भोला प्रकाश यादव वय 20 वर्षे रा. दोन्ही तीलवारा घाट, ता.गोरखपुर, जिल्हा -जबलपूर (म.प्र.) यांचे विरूध्द पोलीस ठाणे – रामनगर येथे एन. डी. पी. एस. कायदा कलम 8 (क),20, 29 अंन्वये* गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपी सतीश दीनानाथ उपाध्याय यास जप्त मुद्देमालासह रामनगर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे..पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया व गुन्ह्यांचा तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक  गोरख भामरे, अप्पर पोलिस अधिक्षक. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे,यांचे नेत्रुत्वात स.पो.नि. संजय तुपे, मपोउपनि- वनिता सायकर, पोलीस अंमलदार राजेन्द्र मिश्रा, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, नेवालाल भेलावे, तुळशीदास लुटे, छगन विठ्ठले, संतोष केदार, राम खंदारे, लक्ष्मण बंजार यांनी कारवाई केली आहे..





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!