विक्रीसाठी आणलेल्या गावठी कट्ट्यासह तीन आरोपी रावनवाडी पोलिसांचे ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

रावणवाडी पोलिसांनी आर.टी.ओ. चेक पोस्ट, रावणवाडी येथे अवैधरित्या पिस्तुल गावठी कट्टा सोबत बाळगणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन केले जेरबंद…

गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक गोंदिया निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी आगामी काळात लोकसभा निवडणुक असल्याने गोंदिया जिल्हयातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर तसेच अवैधरित्या शस्त्रे, बाळगणारे गुन्हेगारावर आळा घालण्याकरीता कारवाई करण्याचे निर्देश सर्व ठाणे प्रभारी यांना दिले आहेत





याअनुषंगाने वरिष्ठांच्या प्राप्त आदेशाप्रमाणे जिल्ह्यांतील अवैध कृत्य करणारे तसेच अवैध शस्त्रे बाळगणारे गुन्हेगारांची माहिती काढून शोध घेवून कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे.त्यानुसार दिनांक 21/03/2024 रोजी रात्र दरम्यान पोलिस ठाणे रावणवाडी चे पो. निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, सोबत पोलिस स्टाफ स.पो.नि. सुनिल अंबुरे व पो.हवा. संजय चौहान असे पोलिस स्टेशन रावणवाडी हद्दीत पेट्रोलिंग करित असतांना गोपनीय बातमीदाराकडुन खाञीशिर माहीती मिळाली की, तीन इसम मोटार सायकल क्रमांक एम.पी.50/ एम.टी. 7198 वर ट्रिपल सीट बसुन बालाघाट कडुन गोंदिया कडे जाणार असुन त्यांचे कडे पिस्तुल सारखा दिसणारा गावठी कट्टा आहे व ते इसम गावठी कट्टा विक्री करण्याकरिता गोंदिया ला जाणार आहेत.



अशा मिळालेल्या खात्रीशीर खबरेवरुन नमुद पोलिस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी रावणवाडी शिवारातील गोंदिया बालाघाट रोडवर असलेल्या आर. टी. ओ बॅरेल चेक पोस्ट जवळ सापळा रचुन नाकाबंदी केली असता मोटार सायकल क्रमांक एम.पी. 50 / एम.टी. 7198 ने येत असताना दिसून आल्याने तिन्ही संशयितांना थांबवुन विचारणा केली असता संशयित ईसंम नामे 1) विशाल मुलायचंदसिंह लिल्हारे वय 23 वर्ष रा. बगदरा ता. जि. बालाघाट (म.प्र.) व त्याचे सोबत असलेले दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेण्यात आले त्यांचेकडे असलेल्या सामानाची पाहणी करून झडती घेतली असता त्यांचेकडे खालील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आला
1) एक पिस्तुल सारखा दिसणारा गावठी कट्टा कि.50,000/- रु. 2) एक काळ्या रंगाची हिरो होंडा शाईन मोटार सायकल क्र एम.पी. 50/ एम.टी. 7198 कि. सु. 30,000/-रु.



3) एक निळ्या रंगाचा रेडमी कंपनीचा मोबाईल कि. 3,000/ रु.

4) एक सिल्वर रंगाचा ओपो कंपनीचा मोबाईल फोन कि. 10,000रु.

5) एक निळया रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल फोन कि. 5,000रु.

असा एकुण 98,000/ रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आला आहे उपरोक्त नमुद आरोपी व दोन विधीसंघर्षीत बालका विरुध्द पोलिस स्टेशन रावणवाडी येथे फिर्यादी पो. हवा. संजय रमेश चौहान यांचे रिपोर्ट वरुन अप क्र 104/ 2024 कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर पोलिस स्टेशन रावणवाडी यांचे मार्गदर्शनात सहा. पोलिस निरीक्षक सुनिल अंबुरे पुढील तपास करित आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधिक्षक  नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहीणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे रावणवाडीचे पो. नि. पुरूषोत्तम अहेरकर, स. पो. नि. सुनिल अंबरे, पो.हवा. संजय रमेश चौहान यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!