कत्तलीकरीता जाणाऱ्या २१ गोवंशीय जनावरांची रावनवाडी पोलिसांनी केली सुटका….
अवैधरित्या कत्तलीसाठी जाणारी २१ गोवंशीय जनावरांची केली सुटका रावनवाडी पोलिसांची कारवाई…….
गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंदे करणारे गुन्हेगार, अवैध जनावरे वाहतुकीवर आळा घालण्याकरीता सर्व ठाणे, प्रभारी यांना निर्देशित केले होते
त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग गोंदिया रोहिणी बानकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे रावणवाडीचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात रावणवाडी पोलिसांनी दि. 29/03/2024 रोजी एका आयचर ट्रक मध्ये अवैधरित्या गोवंशीय जनावरांना कोंबुन वाहतुक करीत आहेत अशा प्राप्त खात्रीशीर माहीती वरून मौजा- चंगेरा शेतशिवार रोडवर सापळा रचून कारवाई केली असता एक कथ्या रंगाचा सहाचाकी आयचर क्र.एम.एच-37 टी-3114 किंमती अंदाजे 12,00,000/-रुपये काळ्या, पांढ-या व लाल रंगाचे एकुण 21 नग गोवंशीय जनावरे प्रत्येकी किं. अंदाजे 10,000/-रुपये प्रमाणे एकुण किमती 2,10,000/-रुपये असा एकुण किंमती 14,10,000/- रु चा मिळुन आला सदर ट्रक व जनावारांची पाहणी केली असता आयचर वाहनामध्ये जनावरांचे चारही पाय दोरीने अत्यंत निर्दयतेने व क्रुरतेने बांधुन त्यांना चारा-पाण्याची सोय व्यवस्था न करता त्यांना कोंबुन अवैधरित्या वाहतुक करतांना मिळून आल्याने पोलिस ठाणे रावणवाडी येथे अपराध क्रं.121/2024 कलम 11, (1) (ड) प्रा. क्र. वा. प्र. अधि. 1960 सहकलम 5 (अ),9 (अ) म.प्रा.सं. अधि.1976 सहकलम 109 भा.दं. वी अन्वये गोवंशिय मालक आरोपी नामे 1) फिरोज खान रशीद खान वय 52 वर्षे रा. सेलू बाजार तालुका- मंगरूळपीर जिल्हा वाशिम 2) राजीव शफी कनुज वय 27 वर्ष रा. बाजार टोला, काटी ता. जि. गोंदिया 3) जितेंद्र हरीलाल अंबुले वय 29 वर्ष रा. बाजार टोला, काटी ता. जि. गोंदिया यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन ताब्यात घेतलेला मुद्देमाल आयशर ट्रक व वर नमुद आरोपी यांना रावनवाडी पोलिसांचे ताब्यात देण्यात आले तसेच एकुण 21 नग गोवंशीय जनावरे यांना त्यांचे चारा पाण्याची सोय व्हावी व सुरक्षिततेच्या दृष्टीने विठठल रुक्मिणी ट्रस्ट गोशाळा कोरणी (घाट) येथे दाखल करण्यात आले आहे
सदरची कारवार्ड पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा,उपविभागीय पोलिस अधिकारी रोहीणी बानकर, यांच्या मार्गदर्शखाली पोलिस ठाणे रावणवाडी चे पो.नि. पुरुषोत्तम अहेरकर, यांचे पोलिस पथकाने केली आहे.