
अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही,१ कोटीचे मुद्देमाल हस्तगत…
स्थानिक गुन्हे शाखेची अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे विरुद्ध धडक कारवाई, ०५ टिपर व २३ ब्रास रेती असा एकुण १,१०,६९,०००/- रु चा मुद्देमाल जप्त…..
गोंदीया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,शासनाचे धोरण व गोंदिया जिल्ह्यातुन अवैधरितिया होणारी रेतीची चोरटी वाहतुक हा महसुल व पोलिस विभागाकरीता चिंतेचा विषय बनलाय याला आळा बसावा म्हनुन पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांनी अशा रेती चोरट्यांवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांना देण्यात आले होते



त्याअनुषंगाने पोनि स्थागुशा यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या पथकास योग्य त्या सुचना देऊन रवाना केल्या यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे दि १७ जुन २०२५ रोजी चे पहाटे 0५/00 वा. पोलिस ठाणे दवनिवाडा हद्दीत पोलिस पथकाने ग्राम साईटोला गावा जवळील वैनगंगा नदीच्या पात्रामधुन अवैध रेती (वाळु) उत्खनन करणा-या तस्करांवर छापा घालून ०५ टिपर ताब्यात घेण्यात आले तसेच चालक व टिप्पर मालंकावर कारवाई करण्यात आली आहे ५ टिपर व २३ ब्रास रेती असा एकुण किमती १,१०,६९,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पो स्टे दवनिवाडा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात सपोनि धीरज राजूरकर, पोलिस अंमलदार संजय चव्हाण, भुवनलाल देशमुख, सोमेन्द्रसिंग तुरकर , छगन विठ्ठले चापोशी राम खंदारे यांनी कारवाई केलेली आहे.




