
वाळुची चोरटी वाहतुक करणारे SDPO तिरोडा यांचे पथकाचे तावडीत सापडले…
अवैधरित्या रेतीची चोरी करुन वाहतुक करणाऱ्यांवर उपविभागीय पोलिस अधिकारी, तिरोडा साहील झरकर यांचे पथकाची कारवाई….
तिरोडा(गोदिया)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, नित्यानंद झा, यांनी आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी यांना त्यांचे पोलिस ठाणे हद्दीत चालणारे अवैध धंदे दारू, मटका, जुगार, अवैध गौण खनिज रेती चोरी,यासारखे व ईतर अवैध धंदे, यांचेवर प्रभावी धाडी घालून जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले आहेत


यानिमित्ताने संपुर्ण जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाविरूद्ध सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंदयावर, छापे टाकून कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे याअनुषंगाने वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे, व मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी, साहिल झरकर, उपविभागिय पोलिस अधिकारी तिरोडा, यांचे पथकाने दि.(29) रोजी अवैध गौण खनिज रेती चोरी प्रकरणी पो. ठाणे तिरोडा हद्दितील मौजा – चीरेखणी येथे कारवाई केली असता अवैधरीत्या गौण खनिज रेतीची चोरी करून वाहतूक करतांना 1 इसम हे त्यांचे ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीसह ज्यात अंदाजे 1 ब्रास रेती (गौण खनिज) सह मिळुन आल्याने रीतसर जप्तीची कायदेशीर कारवाई करण्यात आली असुन सदर प्रकरणी पोलिस ठाणे तिरोडा येथे आरोपी नामे प्रवीण शंकर बिसेन वय 43 वर्षे रा. कवलेवाडा* याचे विरुद्ध कलम 379, भादवी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे नमूद आरोपी याचे ताब्यातून (रेती) चोरी करीता वापरलेले 1 सोनालिका कंपनी चे ट्रॅक्टर ट्रॉली सह ज्यात अंदाजे 1 ब्रास रेती व साहित्य टीकास, फावडे असा एकूण किंमती 06 लाख 3 हजार 850/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा,उपविभागिय पोलिस अधिकारी, तिरोडा साहील झरकर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय कार्यालयातील विशेष पथकातील पो.हवा. गिरीष पांडे, बावणे, सोनवणे यांनी केली आहे.



