
गोंदीया पोलिसांची तिरोडा येथील दोन गुंडावर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…
दोन धोकादायक गुंडाविरुद्ध गोंदिया पोलिसांची MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेची कार्यवाही…
गोंदिया(प्रतिनिधी) – पोलिस ठाणे तिरोडा हद्दीतील गुंड ईसंम 1) धीरज प्रकाश बरियेकर, वय 36 वर्ष, रा. संत रविदास वॉर्ड, तिरोडा, ता.तिरोडा, जिल्हा गोंदिया व 2) अनमोल महादेव घोडीचोर, वय 41 वर्ष, रा. संत सज्जन वॉर्ड तिरोडा, तह तिरोडा जिल्हा. गोंदिया या दोघां गुंडाविरुद्ध एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही करुन एक वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे केले रवाना


याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यांतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर आणि वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी धोकादायक गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगार व्यक्तींवर MPDA कायद्यान्वये कारवाई करण्याचे निर्देश दिले होते

त्या अनुषंगाने वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग तिरोडा साहिल झरकर यांचे मार्गदर्शनात पोलिस ठाणे तिरोडा हद्दीतील धोकादायक गुंड ईसंम नामे धीरज प्रकाश बरियेकर, वय 36 वर्ष, रा. संत रविदास वॉर्ड, तिरोडा, ता.तिरोडा, जिल्हा गोंदिया व अनमोल महादेव घोडीचोर, वय 41 वर्ष, रा. संत सज्जन वॉर्ड तिरोडा, तह तिरोडा जिल्हा. गोंदिया या दोघांविरुद्ध एमपीडीए. कायद्यानुसार प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक, गोंदिया यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांच्याकडे प्रस्ताव मंजुरी करिता पाठविण्यात आलेला होता.जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, गोंदिया मा. श्री. प्रजित नायर यांनी नमूद धोकादायक गुंड इसमांविरूद्ध दिनांक 12/04/2024 रोजी स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे.त्यानुसार पोलिस स्टेशन तिरोडा हद्दीतील सराईत धोकादायक गुन्हेगार गुंड ईसम नामे-धीरज प्रकाश बरियेकर व अनमोल महादेव घोडीचोर या दोघांच्याविरुद्ध MPDA कायादयाअंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे. दिनांक- 13/04/2024 रोजी नमूद दोन्ही गुन्हेगारांना मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे एक वर्ष स्थानबद्धतेकरिता दाखल करण्यात आले आहे.

नमूद दोन्ही गुंड ईसंम हे अत्यंत धाडसी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून यांच्यावर यापूर्वी बरेचदा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे तसेच सदर गुन्हेगारांवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे यातील गुंड इसम नामे- अनमोल घोडीचोर यास यापूर्वी गुन्ह्यात 16 वर्षे शिक्षा सुध्दा झालेली आहे तसेच गुन्हेगार ईसंम नामे धीरज बरीयेकर हासुध्दा यापूर्वी 6 महिने तडीपार राहिलेला आहे दोघांवर वारंवार बरेचदा प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा यांच्या चारित्र्य आणि मनोवृत्तीत, वर्तणुकीत कसलाही बदल, सुधारणा झालेली नाही दोन्ही गुन्हेगार हे मादक पदार्थ दारू, गांजा विक्रीचा व्यवसाय करीत असून यांनी आपल्या व्यवसायाने, गुन्हेगारी प्रवृत्तीने तिरोडा परिसरातील नागरिक, जनतेमध्ये दादा म्हणून ओळख, प्रतिमा तयार केलेली होती त्यामुळे त्यांच्या गुंडशाही प्रवुत्ती गुन्हेगारीवर लगाम घालणे अनिवार्य झाले होते
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा,उपविभागिय पोलिस अधिकारी,तिरोडा साहील झरकर,पोलिस निरीक्षक दिनेश लबडे स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात सपोनि विजय शिंदे, म.पो.उप.नि. वनिता सायकर, पो.हवा. प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, भुवनलाल देशमुख, नेवालाल भेलावे, कोडापे इंद्रजित बिसेन, घनश्याम कुंभलवार, लक्ष्मण बंजार यांनी व पो.ठाणे तिरोडा चे पोलिस निरीक्षक देवीदास कठाळे यांचे नेतृत्वात पोउपनि चिरंजीव दलालवाड, विजयकुमार पुंडे, रोशन खांडेकर, सफौ मनोहर अंबुले, पोहवा देवीदास तुरकर, पो.शि. कैलास ठाकरे, सुर्यकांत खराबे, धनंजय बारई, निलेश ठाकरे, सिद्धार्थ गणवीर तसेच उपविभाग तिरोडा येथील पो. हवा. गोस्वामी यांनी कार्यवाही केली आहे.


